IMPIMP

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवासी महिलांच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी करणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

by nagesh
Pune Crime | Tadipar pune criminals arrested for stealing gold bangles and ornaments of women passengers in PMPML bus pune police crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सोन्याच्या बांगड्या (Gold Ornaments Stolen From PMPML Bus) चोरणाऱ्या तडीपार गुन्हेगारांच्या टोळीला (Tadipar Gang In Pune) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सापळा रचून अटक केली. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून 6 लाख 85 हजार रुपये किमतीचे 143.75 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व मंगळसुत्र जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) पाच जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सर्फराज दत्तु गायकवाड Sarfaraz Dattu Gaikwad (वय-41 रा. आनंदनगर, मुंढवा), योगेश गणेश माने Yogesh Ganesh Mane (वय-40 रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), अमित नाना चव्हाण Amit Nana Chavan (वय-26 रा. शिंदेवस्ती, हडपसर), संतोष शरणाप्पा जाधव Santosh Sharanappa Jadhav (वय-37 रा. मुंढवा), राजेंद्र उर्फ फांदेबाज ज्ञानेश्वर थेऊरकर Rajendra alias Fandebaj Dnyaneshwar Theurkar (वय-42 रा. केशव नगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे स्टेशन (Pune Railway Station) परिसरातून आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक रिक्षा जप्त केली आहे. (Pune Crime)

गुन्हे शाखा युनिट एकचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, तडीपार गुन्हेगारांची टोळी पुणे स्टेशन परिसरात एका रिक्षातून (एमएच 12 एनडब्ल्यू 3933) चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे स्टेशन बस स्टँड (Bus Stand) परिसरात सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाला घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी गुन्हे दाखल असून तडीपार संतोष जाधव याच्यावर पुणे शहरात 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोपींकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता, आरोपी एकत्रितपणे पुणे शहरात (Pune City) फिरुन महिलांच्या हातातील बांगड्या कटरच्या सहाय्याने कट करुन चोरत होते.तसेच बस मधून प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या जवळील पर्स तसेच अंगावरील दागिने चोरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान, शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station)-3, डेक्कन (Deccan Police Station) -2 भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Police Station) -2 असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार, दत्ता सोनवणे,
अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, विजेसिंग वसावे, अशोक माने,
अय्याज दड्डीकर, सतीश भालेकर, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, तुषार माळवदकर,
अजय जाधव, महेश बामगुडे, मिना पिंजण, रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Tadipar pune criminals arrested for stealing gold bangles and ornaments of women passengers in PMPML bus pune police crime branch

 

हे देखील वाचा :

Mumbai-Pune Highway Accident | खंडाळा घाटात रिक्षा उलटल्याने दोघांचा मृत्यू तर एक जखमी

Pune Crime | बायकांमधील भांडणाने मैत्रीत ओतला ‘बिबा’ ! मित्रावर कटरने हल्ला करुन केले जखमी, वानवडी परिसरातील घटना

Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !

 

Related Posts