IMPIMP

Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !

by nagesh
Rupali Patil | ncp leader rupali thombre patil criticized mns over hanuman chalisa controversy in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rupali Patil | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला मशिदींवरील भोंगे (Loudspeaker) काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी मनसेला टोला लगावला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उद्याचा कार्यक्रम म्हणजे मनसेला प्रत्युत्तर आहे. राष्ट्रवादी पक्ष जात धर्म मानत नाही, सध्या रमजान सुरू आहे. उद्या हनुमान जयंती (Hanuman Jayanti) हा योग जुळून आला आहे. राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं मात्र भाजप त्यांच्याकडून हे करून घेत असल्याचं रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3 मे पर्यंतचा अल्टीमेटम (Ultimatum) दिला आहे त्यावर राज्याच्या गृहविभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.
जो कोणी कायदा हातात घेईल त्यावर कारवाई होणार आहे, असा टोला रूपाली पाटील यांनी मनसेला लगावला आहे. यावर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

दरम्यान, हनुमान जयंतीच्या प्रसादानं मुस्लिम नागरिक आपला रोजा सोडणार आहेत.
राष्ट्रवादीच्या शिवानी माळवदकर यांच्याकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे.

 

 

Web Title :- Rupali Patil | ncp leader rupali thombre patil criticized mns over hanuman chalisa controversy in pune

 

हे देखील वाचा :

Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

Reliance Jio New Plan Launch | बेस्ट ऑफर ! एकही रुपया न देता JioPhone मिळणार मोफत

Corona Virus | देशात पुन्हा कोरोना हातपाय पसरवतोय; ‘या’ राज्यांनी वाढवली चिंता

 

Related Posts