IMPIMP

Central Govt Employees Promotion | केंद्र सरकारची मोठी घोषणा ! सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार आहे प्रमोशन, मंत्री म्हणाले – दोन ते तीन आठवड्यात होईल जाहीर

by nagesh
Central Govt Employees Promotion | central government employees promotion of group a officers news

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाCentral Govt Employees Promotion | केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सिंह यांनी म्हटले की, 1 जुलै रोजी 8,000 हून अधिक सरकारी कर्मचार्‍यांना भरघोस पदोन्नती दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अनेक अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याची तयारी सुरू आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांत केंद्र सरकारकडून पदोन्नतीबाबत घोषणा केली जाणार आहे. यासंदर्भात PIB ने ट्विट करून माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या वतीने गट – A अधिकार्‍यांना पुढील स्लॉटमध्ये पदोन्नती दिली जाऊ शकते. (Central Govt Employees Promotion)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा गट – A च्या अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय मंत्री Dr. Jitendra Singh यांची भेट घेऊन त्यांना प्रलंबित पदोन्नतीची माहिती दिली. त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. तसेच प्रमोशन देण्यातील अडथळे दूर केले जातील.

 

ग्रुप – ए कर्मचार्‍यांना दिले आश्वासन

या भेटीत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या पदोन्नतीची बाब नियमानुसार जलद गतीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याआधी, 1 जुलै 2022 पासून, डीओपीटीने एकाच वेळी तीन प्रमुख सचिवालय सेवांशी संबंधित 8,089 हून अधिक सरकारी कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात पदोन्नती दिली होती. (Central Govt Employees Promotion)

कोणत्याही पदोन्नतीशिवाय सेवेतून निवृत्त होणे सरकारी कर्मचार्‍यांसाठी निराशाजनक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 8,089 कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यामधील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यामुळे भविष्यातील सर्व पदोन्नती आतापासून सुरळीत केल्या जातील, असे ते म्हणाले.

 

01 जुलै रोजी 8000 हून अधिक कर्मचार्‍यांना पदोन्नती

01 जुलै 2022 रोजी केंद्र सरकारने तीन केंद्रीय सचिवालय संवर्गातील 8000 हून अधिक कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
केंद्रीय सचिवालय सेवा ही प्रशासकीय नागरी सेवांपैकी एक आहे,
ज्यामध्ये गट A आणि गट B पदांवर काम करणारे कर्मचारी आहेत.

केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये प्रशासकीय काम करणारी अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याचे काम अखेर 2019 मध्ये करण्यात आले होते.
त्यावेळी तिन्ही सेवांमध्ये 4000 अधिकार्‍यांना पदोन्नती देण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : – Central Govt Employees Promotion | central government employees promotion of group a officers news

 

हे देखील वाचा :

Supreme Court On PMLA Act | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PMLA अंतर्गत कारवाईच्या हस्तक्षेपास नकार

Pune Crime | ज्युनिअर महिला वकिलाचा विनयभंग करणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल

Nude Photo Shoot | Ranveer Singh वर पुण्यात मनसे शारीरिक सेनेकडून तक्रार

 

Related Posts