IMPIMP

Pune Crime | जेवण न दिल्याने हॉटेल कामगारावर हल्ला, 3 सराईत गुन्हेगार गजाआड; वारजे परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | जेवण न दिल्याच्या रागातून तीन सराईत गुन्हेगारांनी (Criminal) हॉटेलमधील कामगारावर धारदार शस्त्राने हल्ला (Attack) करुन जखमी केले तसेच हॉटेलमधील रोकड चोरून (Stealing Cash) नेल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime) वारजे परिसरात मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) तीन सराईत गुन्हेगारांना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंगेश विजय जडितकर (वय-23 रा. शिवणे), सौरभ प्रकाश मोकर (वय-22 रा. उत्तमनगर) आणि शुभम अनिल सुडेवार (वय-25 रा. वारजे) यांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत चंद्रकांत हणमंतराव वरवटे (रा. यशोदीप, चौक, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी यांचे वारजे पुलाजवळ साई सरिता नावाचे हॉटेल आहे.
रविवारी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर आरोपी हॉटेलमध्ये आले. त्यांनी जेवण मागितले.
त्यावेळी फिर्यादी यांनी हॉटेल बंद झाले असून काहीही खाद्यपदार्थ शिल्लक नसल्याचे सांगितले.-
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी केले.
तसेच हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने घेऊन पसार झाले. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी
तिघांचा शोध घेऊन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत
(Police Custody) ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

 

हे देखील वाचा :

Katrina Kaif Pregnant | कतरिना कैफ आहे प्रेग्नंट?, व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे बेबी बंप

Sharad Pawar | गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का

Pune News | औंध आयटीआयमध्ये १५ नोव्हेंबरपासून अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम

 

Related Posts