IMPIMP

Pune Crime | Google वर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे पडले सव्वा दोन लाखांना; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Cyber Crime News | He sent the money thinking that his sister in America was in trouble; One and a half lakhs stolen by cyber thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | स्टेट बँक ऑफ इंडियाचे अ‍ॅप डाऊनलोड (SBI App Download) केल्यानंतरही अडचणी दूर न झाल्याने एका महिलेने बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर Google वरुन शोधला (Bank Customer Care Number). मात्र, हा नंबर सायबर चोरट्यांचा (Cyber Crime) निघाला आणि त्यांना २ लाख २२ हजार रुपयांचा फटका बसला. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ४८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०४ /२२) दिली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी असून त्यांचे पती दुबईला असतात.
त्यांचे पती त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावर पैसे पाठवत असतात.
जुलै २०२१ मध्ये त्यांना बँक खात्यासंदर्भात अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. तेव्हा त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली.
त्यांना एसबीआय अ‍ॅप डाऊनलोड करायचा सल्ला बँकेने दिला.
त्यानंतरही त्यांच्या अडचणी दूर न झाल्याने त्यांनी ३१ जुलै रोजी गुगलवरुन एसबीआय कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर फोन केला.
त्यावरील पुरुषाने त्यांना अ‍ॅनीडेक्स व टेक्स्ट मेसेजचा अ‍ॅप असे दोन वेगवेगळे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यावर त्यांनी आपले बँक खात्याची माहिती भरली. तेव्हा कस्टमर केअरवरील पुरुष त्यांना वारंवार एरर येत असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीला मोबाईल होल्ड करुन ठेवण्यास सांगितले. अर्धा तास फोन होल्डवर असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मुलीला एटीएम कार्ड देऊन मिनी स्टेटमेंट काढण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या खात्यातून Paytm, अमेझॉन, क्विक सिल्वर अशा वेगवेगळ्या ऑनलाईन ट्रान्झक्शनमधून पैसे काढल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी फोन कट करुन दोन्ही अ‍ॅप डिलिट केले. तसेच त्यांच्या खात्यातून चित्तरंजन रेल्वे स्टेशन येथील एटीएममधून पैसे काढले गेल्याचे समजले. अर्ध्या तासाच्या आत त्यांच्या खात्यातून २ लाख २२ हजार ९४६ रुपये वेगवेगळ्या ठिकाणाहून काढले गेले. पोलीस निरीक्षक संगिता यादव तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | Two and a half lakh people had to find the banks customer care number on Google FIR at Bharti Vidyapeeth Police Station

 

हे देखील वाचा :

Fig Benefits | पुरुषांसाठी कामाची गोष्ट आहे अंजीर, रोज खाल्ल्याने होतील 3 आश्चर्यकारक फायदे

Pune Crime | फंडामध्ये पैसे गुंतविण्यास सांगून महिलांची फसवणूक; महिलेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

MNS On Bhagat Singh Koshyari | ‘नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय‘ – मनसे

 

Related Posts