IMPIMP

Pune Crime | अल्पवयीन मुलीशी ‘संबंध’ ठेवल्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी; 67 लाख उकळणार्‍या हडपसर मधील दोघांना अटक, कोंढाव्यात FIR

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | अल्पवयीन मुलीशी (Minor Girl) शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवल्याने तिला
गर्भधारणा झाली आहे. तिने बलात्काराची (Rape In Pune) तक्रार पोलिसांकडे करु नये, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना पैसे देण्याचे कारण सांगून
दोघांनी या मुलीशी संगनमत करुन एका तरुणाकडून तब्बल ६७ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी भावडी, वाघोली (Wagholi) येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७७६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन रवींद्र हिंगमिरे Chetan Ravindra Hingmire (रा. काळेपडळ, हडपसर), निखील ऊर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे Nikhil alias Gaurav Dnyaneshwar Mhetre (वय २७, रा. गाडीतळ, हडपसर) यांना अटक (Arrest) केली आहे. तसेच त्यांची साथीदार तरुणीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२० पासून सुरु होता. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि एका मुलीचे प्रेमसंबंध (Love Affair) होते. त्यातून त्यांच्यात शारीरीक संबंध निर्माण झाले. तिने व तिचे मित्र चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे यांनी संगनमत करुन फिर्यादीला लुबाडण्याचा कट रचला. या दोघांनी फिर्यादीला ही मुलगी अल्पवयीन आहे. तसेच तुझ्यामुळे तिला गर्भधारणा झाली आहे, असे सांगून ती पोलिसांकडे बलात्काराची तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादीच्या घरी हे सांगण्याची धमकी (Threat) दिली. प्रकरण मिटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतील, असे धमकी दिली. फिर्यादी यांनी घाबरुन ते सांगतील, त्याप्रमाणे वेळोवेळी पैसे देत गेले. त्यांनी आतापर्यंत ६७ लाख ७ हजार ५५३ रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. त्यानंतरही अजून पैसे मागत होते. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर फिर्यादी यांनी घाबरुन गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट ५ च्या पथकाने तातडीने याची दखल घेऊन दोघांना अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Two youth from hadapsar arrested for extorting 67 lakhs by threatening to report to the police for having relations with a minor girl, fir in kondhwa police station

 

हे देखील वाचा :

Tata Group | टाटाच्या ‘या’ स्टॉकद्वारे होईल बंपर कमाई ! एक्सपर्टने 540 रुपयांच्या टार्गेट प्राईससह दिले Buy रेटिंग

Pune News | बहुसोमयाजी यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांचे पुण्यात श्रावण मास शिवपूजन अनुष्ठान

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना आमदारकी वाचवण्यासाठी 3 पर्याय, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ?; मनसे नेत्याने सांगितले…

 

Related Posts