IMPIMP

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | What do you say! Yes, the IT engineer filed a case directly against the owner for hitting the buffalo in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | म्हशीने धडक दिल्यामुळे पत्नी सोबत मोटरसायकलवरून जात असलेला आयटी इंजिनिअर जखमी झाला असून त्याच्या करंगळीला मार लागला आहे. या आयटी अभियंत्याने थेट लष्कर पोलिस ठाणे गाठत म्हशीच्या मालकाविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. लष्कर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जुबेर असलम शेख (वय 38 रा. निळकंठ विहार, कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहानवाज अब्दुल रजाक कुरेशी, सदाकत कुरेशी, नदाफत कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर शेख हे त्यांच्या पत्नीला घेऊन मोटारसायकल वरून जात होते. त्यावेळी आरोपींच्या मालकीची म्हैस घेऊन एक जण खड्डा बाजार येथून जात होता. मोहम्मद स्ट्रीटवरील कुरेशी दरबार या ठिकाणावरून जात असताना म्हैस अचानक बिथरली. आणि तिने हिसका मारून पळण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत त्या म्हशीची जुबेर यांना धडक बसली.  हे दोघे पती-पत्नी खाली पडले. यामध्ये जुबेर यांच्या करंगळीला मार लागला.
जुबेर हे एका आयटी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतात. या घटनेबाबत त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास करताना म्हशीच्या  मालकांकडे चौकशी केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी कुरेशी हे गवळी व्यवसाय करतात. त्यांचा कॅम्पमध्ये गोठा आहे. त्यांच्याकडे या व्यवसायाचे
शासकीय लायसन्स देखील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक
प्रल्हाद डोंगळे करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | What do you say! Yes, the IT engineer filed a case directly against the owner for hitting the buffalo in Pune

 

हे देखील वाचा :

Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या दिल्ली अन् मुंबईचा नंबर

RBI Rules | 50 हजारपेक्षा जास्तीचा चेक देणे ठरू शकते अडचणीचे; जाणून घ्या काय आहे RBI चा नवीन नियम?

Pune Crime | पुण्यात पोलिस अधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा, प्रचंड खळबळ

 

Related Posts