IMPIMP

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Satara Crime | Suicide of a minor suspect in a juvenile detention center in Satara

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील 439 फ्लॅटमध्ये शिरुन चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील शिंदे वस्तीत (Shinde Vasti, Hadapsar) हा प्रकार घडला (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी तहसीलदार विकास भालेराव Tehsildar Vikas Bhalerao (वय 47, रा. फुलेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police
Station) फिर्याद दिली आहे. भालेराव हे तहसीलदार ताबा या पदावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये (Slum
Rehabilitation Authority Pune and Pimpri Chinchwad) कार्यरत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शिंदे वस्ती येथे झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारती बांधल्या आहेत. या इमारती कुलूप लावून बंद असताना इमारत क्रमांक A विंगमधील 215 सदनिका व B विंगमधील 224 सदानिका अशा एकूण 439 सदनिकाचे कडी कोयंडा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. या घरातील नळ, मिक्सर व शॉवर असे तब्बल 1 लाख 9 हजार 750 रुपयांचा माल चोरुन नेला. चोरीचा हा प्रकार 4 जून ते 26 ऑगस्ट 2021 दरम्यान घडला आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | What do you say Yes, theft in 439 flats in Pune, know the case

 

हे देखील वाचा :

Satara Crime | सातार्‍यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या

Related Posts