IMPIMP

Pune Crime | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिलेवर वार करून लुटले

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यामध्ये चोरांचा अक्षरश: सुळसुळाट पहायला मिळत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Pune Collectorate) परिसरात एका पादचारी महिलेवर चाकूने वार (Stabbing) करुन चोरट्यांनी तिच्याकडील रोकड आणि मोबाईल असलेली पिशवी चोरुन नेल्याची (Stolen) घटना घडली आहे. याप्रकरणी  पोलिसांनी रोहिदास साईदास चव्हाण Rohidas Saidas Chavan (वय – 35 रा. वडारवाडी) याला अटक (Arrest) केली आहे. या हल्ल्यात महिला जखमी (Pune Crime) झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी जखमी झालेल्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (Dr. Babasaheb Ambedkar Udyan) परिसरातून जात होती. त्यावेळी आरोपी चव्हाण याने त्यांना अडवले व त्यांच्यावर चाकूने वार केले. महिलेकडील रोख रक्कम (Cash) व मोबाईल (Mobile) असा बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन पळून गेला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करुन पकडले. चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव (PSI Vijay Jadhav) करीत आहेत. (Pune Crime)

 

हडपसरमध्ये पादचाऱ्याचा मोबाईल चोरला
हडपसर भागात सकाळी एका पादचाऱ्याचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी हनुमंत जाधव Hanumant Jadhav (वय – 30) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde) करीत आहेत.

 

कोंढव्यात चाकूच्या धाकाने लुटले
कोंढवा परिसरामध्ये चाकुचा धाक दाखवून चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची (Bike Theft) घटना घडली आहे.
याबाबत अल्पेश शहा Alpesh Shah (वय – 30 रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
दुचाकीस्वार शहा कोंढवा भागातील पासलकर चौकातून रात्री दहाच्या सुमारास जात होते.
त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
शहा यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांच्याकडील दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.

 

 

Web Title :- Pune Crime | woman stabbed robbed near collector office thieves

 

हे देखील वाचा :

BJP Leader Anand Rekhi | “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम” – भाजप नेते आनंद रेखी

NCP MLA Dilip Mohite | राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी ! म्हणाले – ‘अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं’

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Diabetes Diet | तुम्ही सुद्धा असाल डायबिटिज तर ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश, ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होईल मदत

 

Related Posts