IMPIMP

NCP MLA Dilip Mohite | राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी ! म्हणाले – ‘अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं’

by nagesh
MLA Devendra Bhuyar | MLA devendra bhuyar on ajit pawar for cm maharashtra udhhav thackeray maharashtra politics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन NCP MLA Dilip Mohite । राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Elections) महाविकास आघाडीचे
(Mahavikas Aghadi) तीन उमेदवार निवडून आले. तर भाजपचेही (BJP) तीन उमेदवार निवडून आले. सहाव्या जागेच्या अटीतटीच्या लढतीत मात्र
भाजपने शिवसेनेला (Shivsena) दणका तर आघाडी सरकारला झटका दिला आहे. सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेच्या संजय पवारांचा (Sanjay Pawar) पराभव झाला. यामध्ये भाजपची खेळी यशस्वी झाली आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमधील नाराजीनाट्य समोर आलेय. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (NCP MLA Dilip Mohite) यांनी ही नाराजी दर्शवली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (NCP MLA Dilip Mohite) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “मागील दोन अडीच वर्षापासून आमचा कुणी विचार केला नाही. मंत्रालयात आल्यावर अजित दादांना भेटायचो. सगळ्या समस्या त्यांना सांगायच्या. सगळ्या पक्षातील आमदारांना मदत करण्याचं काम ते करतात. अजित पवार नसते तर हे सरकार टिकलं नसतं. आमच्यासारख्या आमदारांचा ते विचार करतात. तर बाकीच्यांनी का करू नये ?” असा सवाल देखील मोहिते यांनी उपस्थित केला.

 

 

पुढे आमदार मोहिते म्हणाले, “जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. गेली वर्षभर आमच्या अनेक फाईल्स मंत्रालयात पडून आहेत. त्या माझ्या वैयक्तिक नाही. पंचायत समिती इमारत, प्रशासन इमारत, पोलीस स्टेशनची इमारत तालुक्याकरता आहे. मी त्याला निधी द्या म्हणतोय त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये.” असं राजकारण करू नये. आमचं राजकारण अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला पण, तरीही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल माझी नाराजी आहे,” असं त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे.

 

संजय राऊतांची भाजपवर टीका..
“भाजपाने जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला.
काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील.
पण आम्ही उद्या पाहू,” असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
तसेच बहुजन विकास आघाडीचे 3 अपक्ष आमदारांची 3 मतं आम्हाला मिळाली नाहीत.
ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे,” असा दावा देखील राऊत यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- NCP MLA Dilip Mohite | this government would not have survived without ajit pawar ncp mla dilip mohite angry with cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Diabetes Diet | तुम्ही सुद्धा असाल डायबिटिज तर ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश, ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होईल मदत

NCP MP Supriya Sule | ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन… ‘ – सुप्रिया सुळे

 

Related Posts