IMPIMP

Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Lashkar Crime News | अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी देऊन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला (Molestation Case). तसेच याबाबत कोणाला सांगितले तर बघुन घेण्याची धमकी पीडित मुलीला व तिच्या मैत्रिणीला दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 7 मार्च ते 13 मार्च या कालावधीत कॅम्प पुणे (Camp Pune) भागातील एका शाळेच्या परिसरात घडला आहे.

याबाबत पीडित 13 वर्षीय मुलीच्या आईने बुधवारी (दि.13) लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून व्हॅन चालक शरणप्पा यजमान मुलगेरा (रा. मु.पो. नेण्णेगाव ता. अक्कलकोट, जि. सोलापूर सध्या रा. सय्यदनगर, वानवडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354ड सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कॅम्प परिसरातील शाळेत शिकते. आरोपी पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या व्हॅनचा चालक आहे. आरोपीने फिर्य़ादी यांच्या मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिच्याकडे मोबाईल नंबरची मागणी केली. मात्र मुलीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला. आरोपीने पीडितेची भेट घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी पीडितेच्या मैत्रिणी मार्फत दिली. याबाबत कोणाला काही सांगितले तर दोघींना बघुन घेईल अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या मुलीचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.

MLA Sunil Tingre | शास्ती कराची सवलत सरसकट सर्व शहराला द्यावी, आमदार सुनील टिंगरेंची मागणी

Related Posts