IMPIMP

Pune Lok Sabha Election 2024 | वंचितकडून वसंत मोरे रिंगणात आल्याने पुणे मतदार लोकसभा संघातील निवडणुकीत रंगत (Videos)

by sachinsitapure

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी दिल्याने शहरातील निवडणुकीत रंग भरला आहे. सुरवातीला महायुतीचे (Mahayuti) मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यामध्ये सरळसरळ लढत होईल असे वाटत असतानाच मोरे यांच्या उमेदवारीमुळे रंगत वाढली आहे. मोरे यांना मानणारा मतदार आणि वंचितचा मतदार नेमका कोणाला फटका देणार? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

पुणे लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या गिरीष बापट (Late MP Girish Bapat) यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी (Mohan Joshi Congress) यांचा सव्वातीन लाख मतांच्या मताधिक्याने पराभव केला होता. वंचितचे उमेदवार अनिल जाधव (Anil Jadha VBA) यांना सुमारे ६५ हजार मते मिळाली होती. प्रामुख्याने जाधव यांना हे मतदान आंबेडकरी चळवळीला माननार्‍या मतदारांकडून झाले होते. यंदाच्या निवडणुकीतील चित्र वेगळे आहे. महापालिकेमध्ये एकाच वेळी नगरसेवक असलेले मोहोळ, धंगेकर आणि मोरे हे तिघेही समोरासमोर निवडणुक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोरे यांनी काही दिवसांपुर्वीच मनसेचा (MNS) राजीनामा दिला असून त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती.

स्थायी समिती अध्यक्ष नंतर महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांची कारकिर्द गाजली असून पाचवेळा नगरसेवक असलेले रवींद्र धंगेकर यांनी गेल्यावर्षी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप युतीचा पराभव केल्याने देशभरात पोहोचले आहेत. मत कामाच्या हटके स्टाईलमुळे आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून तीनवेळा नगरसेवक राहीलेले मोरे हे चांगलेच परिचित आहेत.

महापालिका आणि देशपातळीवरील निवडणुकीमध्ये फरक असतो याची जाणीव तीन्ही उमेदवारांना आहे. मोहोळ आणि धंगेकर हे राष्ट्रीय पक्षांकडून मैदानात असल्याने प्रमुख लढत ही त्या दोघांमध्येच होणार आहे, हे स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा करिष्मा आणि केंद्र व राज्यातील सत्ता ही मोहोळ यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तर राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या दहा वर्षांच्या कारकिर्दी विरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्रित येउन स्थापन केलेल्या इंडिया आघाडीमुळे (INDIA Aghadi) दोन स्वतंत्र मतप्रवाह तयार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना बदलली जाईल या भाजप नेत्यांच्याच जाहीर वक्तव्यांचा आधार घेत सत्ताधार्‍यांविरोधात मागील काही महीन्यांपासूनच रान पेटविले आहे. यामुळे आंबेडकरी विचारांना माननारा मोठा वर्ग इंडिया आघाडीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळत आहे. दुसरे असे की जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईची सर्वाधीक झळ ही गरीब आणि मध्यमवर्गीयांनाच बसत असल्यानेही हा नाहीरे वर्ग डावीकडे झुकल्याचे पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या वसंत मोरे यांना वंचितचा मतदार कितपत साथ देईल, हा प्रामुख्याने उत्सुकतेचा विषय राहाणार आहे. वसंत मोरे यांची नगरसेवक पदाची कारकिर्द ही कात्रज परिसरात राहीली आहे. हा परिसर बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये (Shirur Lok Sabha Election 2024) येतो. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून मतदान मिळवताना मोरे यांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे मोहोळ आणि धंगेकर यांच्यामध्ये जोरदार लढत झाल्यास दोघांमधील मतांचा फरक किती असेल आणि वसंत मोरे यांना किती मते मिळतात यावर विजयाचा दोलक हा फिरणार असे तूर्तास तरी दिसते.

Related Posts