IMPIMP

Pune News : मनपात भाजपाची एकहाती सत्ता; तरीही कामे रखडल्याची खासदार बापटांकडून अजित पवारांकडे तक्रार

by sikandershaikh
Pune News | bjps one sided power in pmc mp bapat complains to ajit pawar that work is still delayed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune News | भाजपा पुणे महापालिकेत सत्ताधारी पक्ष असून पक्षाचे तब्बल 100 नगरसेवक आहेत. बहुमत असूनही महापालिकेत भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या खासदार निधीतून सूचवण्यात आलेली कामे अडकून पडली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यासंबंधी स्वत: बापट यांनीच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

पुण्यातील (Pune News) कोरोना महामारीच्या स्थितीचा आढावा रविवारी पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला. बैठकीला लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासदार गिरीश बापट यांनी महापालिकेत कामे होत नसल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली.

या तक्रारीवर पालकमंत्री अजित पवार यांनी राजकीय कोपरखळी मारत महापौर मुरलीधर मोहोळ यांची चांगली कोंडी केली होती. तुम्ही खासदारांची कामे अडविता, अशी एकदा नव्हे तर दोन वेळा कोपरखळी पालकमंत्र्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मारली. पुणे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असतानाही राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचीच कामे होत नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
बापट यांच्या कामांमध्ये कोणत अडथळे आणत आहे, यावर आता राजकीय चर्चा रंगली आहे.
बापट यांचे जे काम अडकले आहे, ते पालिकेच्या वाहन विभागाशी संबंधित असल्याचे समजते.
मात्र, याबाबत बापट यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या निवडीत भाजपाने 6 सदस्यांची निवड केली.
यामध्ये बापट समर्थक नगरसेवकांना स्थान मिळू शकलेले नाही.
ही सर्व परिस्थिती पाहता पक्षाची अंतर्गत गटबाजी आहे की, पालिकेत भाजपाचा अधिकारी वर्गावर दबदबा राहिला नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण; शरद पवारांनी घेतली ‘ही’ विशेष खबरदारी

Related Posts