IMPIMP

Pune Pimpri Crime | पैसे डबल करून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरला 16 लाखांचा गंडा; पुणे जिल्ह्यातील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Cyber Police Station - Woman cheated in the name of selling furniture in the name of Facebook friend

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | तुम्ही जेवढी गुंतवणूक (Investment) कराल त्याचा दरमहा नफा देईन तसेच रक्कम दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून एका डॉक्टरची (Doctor) 16 लाखांची फसवणूक (Fraud) केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत खेड तालुक्यातील वराळे येथे घडला आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गणेश मुरलीधर सोनवणे Ganesh Muralidhar Sonawane (वय 38, रा. शभश्री रेसिडेन्सी, आकुर्डी, पुणे) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge Police Station) शुक्रवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पप्पू रामदेवाशी Pappu Ramdevashi (रा. वराळे, मूळ रा. जादान, ता. खर्ची मारवाड, जि. पाली, राजस्थान) याच्यावर आयपीसी 406, 420, 507 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे वराळे येथे दवाखाना आहे. दवाखान्याजवळ आरोपीचे किराणा मालाचे दुकान (Grocery Store) असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी हा परराज्यातील असल्याने त्याला कोणतीही बँक कर्ज देत नव्हती.
तसेच त्याला भिशीचे पैसे मिळत नसल्याने त्याने फिर्यादी यांच्याकडे आर्थिक मदत मागितली.
आरोपीने फिर्यादी यांना वेळोवेळी तुम्ही फक्त गुंतवणूकदार म्हणून मला आर्थिक मदत करा.
तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल त्याचा दरमहा नफा देतो. तसेच पैसे डबल करून देतो असे सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून त्याला 15 लाख 60 हजार रुपये दिले.
काही दिवसांनी फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली.
त्यावेळी आरोपीने फोन करून जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill) फिर्यादी यांना दिली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सारंग (API Sarang) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 16 lakhs extorted from the doctor on the pretext of doubling the money; Incidents in Pune district

 

हे देखील वाचा :

NCP Leader Ajit Pawar | ‘अरे गोपीचंदा काय बोलतो’ असे म्हणत पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी; अनेक मुद्द्यांवर मांडले मत

Basavaraj Bommai | बसवराज बोम्मई वाद उकरून काढत म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शहांची ….’

Satara Crime | बकासुर टोळीचा म्होरक्या व त्याच्या 16 साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई

 

Related Posts