IMPIMP

Satara Crime | बकासुर टोळीचा म्होरक्या व त्याच्या 16 साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई

by nagesh
 Kolhapur Crime News | 32 year old son went to sleep on the mountain after attacking his parents in the house

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – दुकानदार आणि धनवानांकडून हफ्तेवसुली आणि गुंडगिरी करून साताऱ्याच्या गुन्हेगारी (Satara Crime) विश्वात हातपाय पसरू लागलेल्या बकासुर टोळीवर महाराष्ट्र पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. बकासुर टोळीचा म्होरक्या यश नरेश जांभळे आणि त्याच्या 16 साथीदारांवर मोक्का (Satara Crime) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सातारा शहरात गुन्हेगारी कृत्यांवर वचक बसवला जाईल.

 

सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांची साताऱ्यातील गुंड टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या बकासुर टोळीतील गुंडांविरुद्ध अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. साताऱ्यातील आर्यन विशाल कडाळे या तरुणाकडे या टोळीने हप्ता मागितला होता. पण कडाळे याने हप्ता न देता या टोळीच्या विरोधात पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे या टोळीने आर्यनला हप्ता दुप्पट करण्याची धमकी दिली होती. तरीदेखील हफ्ता न दिल्याने यश जांभळे आणि त्याच्या टोळीने कडाळेला त्याच्या भागात जाऊन भरदिवसा चाकूने भोसकले होते. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. (Satara Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या टोळीला आवर घालण्यासाठी शहूपुरी पोलीस ठाण्याचे (Shahupuri Police Station) पोलीस निरीक्षक संजय पतंगे (Police Inspector Sanjay Patange) यांनी या टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून यश जांभळे आणि इतर 16 जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाईला जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

टोळी प्रमुख यश नरेश जांभळे, राहुल संपत बर्गे, टेटया ऊर्फ गौरव अशोक भिसे,
ऋषिकेश ऊर्फ शुभम हणमंत साठे, अनिकेत उदय माने, आदित्य सुधीर जाधव, शंतनू राजेंद्र पवार,
अनिकेत सुभाष पारशी, पिन्या ऊर्फ सुनील माणिकराव शिरतोडे एक अनोळखी तरुण आणि 7 विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.

 

Web Title :- Satara Crime | ‘Mokka’ action against the leader of Bakasur gang and his 16 companions

 

हे देखील वाचा :

Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित; हडपसर जमीन प्रकरण व कोरोना काळातील खरेदी भोवली?

Amol Mitkari | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रया; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी भीक…’

Bhagat Singh Koshyari | मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

Related Posts