IMPIMP

NCP Leader Ajit Pawar | ‘अरे गोपीचंदा काय बोलतो’ असे म्हणत पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी; अनेक मुद्द्यांवर मांडले मत

by nagesh
NCP Leader Ajit Pawar | ncp leader ajit pawar criticism on bjp mla gopichand padalkar maharashtra politicial news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी (NCP Leader Ajit Pawar) सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या अनेक घडामोडींवर त्यांचे मत मांडले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले. पण काहींनी गद्दारी केल्यामुळे आमचे सरकार गेल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवारांनी (NCP Leader Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आता काहीजण गरळ ओकत आहेत. आधी महिलांबद्दल मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी गरळ ओकली. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी चुकीचे बोलले. आता आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणतात की, अफजलखानाने शिवाजी महाराजांचा कोथळा काढला. अरे गोपीचंदा काय बोलतो. आपण आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे.’

 

‘कोणीही सत्तेचा माज करू नये. मागे मंत्री मंगलप्रभात लोढा बोलले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तावडीतून सुटले. शिंदे सुटले कसले, एकनाथ शिंदे पळाले. आधी सुरत मग गुवाहाटी, मग परत रेडा असं ऐकलं त्यानंतर जोतिषाला हात दाखवायला गेले,’ असा टोला अजित पवारांनी लगावला. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याची खबर घेतली. ‘आपण शिक्षणाला देणगी दिली म्हणतो. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात भीक मागितली. तुम्ही काय बोलता? तुम्ही आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. त्यामुळं आमची का बदनामी करता?’, असा प्रश्न अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अजित पवारांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, ‘आपल्याकडे साखरेला 3 हजार 100 रुपये ते 3 हजार 200 रुपयेचा दर दिला जातो.
तीच साखर परदेशात 3 हजार 900 ते 4 हजार रुपयांनी विकली जाते. आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळू देत नाहीत.
मागच्या वर्षीची साखर अजूनही शिल्लक आहे. त्याला रोज एक रुपयाचे व्याज लागत असल्याचे पवार म्हणाले.’
त्यात आपल्याकडे येणारे दीड लाख रोजगार निर्माण करणारा कारखाना गुजरातला दिला.
ज्या पद्धतीने काम करायचे त्या पद्धतीने सरकार काम करत नसल्याचे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- NCP Leader Ajit Pawar | ncp leader ajit pawar criticism on bjp mla gopichand padalkar maharashtra politicial news

 

हे देखील वाचा :

Basavaraj Bommai | बसवराज बोम्मई वाद उकरून काढत म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शहांची ….’

Satara Crime | बकासुर टोळीचा म्होरक्या व त्याच्या 16 साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई

Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित; हडपसर जमीन प्रकरण व कोरोना काळातील खरेदी भोवली?

 

Related Posts