IMPIMP

Basavaraj Bommai | बसवराज बोम्मई वाद उकरून काढत म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शहांची ….’

by nagesh
Basavaraj Bommai | maharashtra delegation has met the union home minister will not make any difference says karnatak cm basavraj bommai maharashtra karnataka border dispute

बंगळुरू : वृत्तसंस्था – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेट घेत आहे आणि त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) त्यात तेल ओतत आहेत. त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावर भूमिका घेण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तरीदेखील बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) पुन:पुन्हा हा वाद उकरून काढून महाराष्ट्राला डिवचत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

“महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न अनेकदा केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही,” असे ट्विट बसवराज बोम्मई यांनी केले आहे. तसेच कर्नाटक महाराष्ट्रच्या सीमाप्रश्नावर मी कर्नाटकच्या खासदारांना घेऊन सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे, असेदेखील बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा चिडविण्याचा प्रयत्न केला आहे.
अगोदर त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या 40 गावांवर दावा केला होता.
तेव्हापासून हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिकादेखील घेतल्या होत्या.
कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या लोकांनी महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केली होती.
त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक केली होती. तेव्हापासून हा प्रश्न जास्त तापला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांच्यासोबत चर्चा केली आहे.
पण, त्यावर त्यांनी काही चांगली भूमिका घेतली नाही.
महाराष्ट्राच्या गावांसाठी महाराष्ट्र सरकार विशेष सुविधा पुरवत आहे.
त्यामुळे आम्ही त्यांना कर्नाटकात जाण्यापासून रोखू, असा दावा महाराष्ट्र सरकारने केला आहे,
तर बोम्मई यांनी याच्या उलट भूमिका घेतली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Basavaraj Bommai | maharashtra delegation has met the union home minister will not make any difference says karnatak cm basavraj bommai maharashtra karnataka border dispute

 

हे देखील वाचा :

Satara Crime | बकासुर टोळीचा म्होरक्या व त्याच्या 16 साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई

Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित; हडपसर जमीन प्रकरण व कोरोना काळातील खरेदी भोवली?

Amol Mitkari | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रया; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी भीक…’

 

Related Posts