IMPIMP

Pune Pimpri Crime | महिलेच्या हातावर वार करुन पर्स चोरून पळणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पकडले; चिखली पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | पतीसोबत रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन आरोपींनी महिलेची
पर्स चोरुन (Stealing a Purse) पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना (Pune
Pimpri Crime) शनिवारी (दि.3) रात्री 7.40 च्या सुमारास चिंचवड येथील विठ्ठल मंदिराजवळ घडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) रविवारी (दि.4) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अक्षय परमेश्वर लवटे Akshay Parameshwar Lovete (वय-22 रा. दत्त सोसायटी, चिखली), सुनिल मधुकर अर्जुन Sunil Madhukar Arjun (वय-25 रा. म्हेत्रे वस्ती, चिखली) यांच्यावर IPC 394,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला असून अक्षय लवटे याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात (Arrest) दिले.
(Pune Pimpri Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पतीच्या मित्राच्या घरी सत्यनारायणाची पुजा असल्याने पतीसोबत रस्त्याने पायी जात होते.
त्यावेळी समोरुन दुचाकीवरुन दोन जण आले.
दुचाकीवर पाठीमागे बसलेला अक्षय लवटे याने फिर्यादी यांची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांनी पर्स पकडून ठेवल्याने आरोपीने धारदार हत्याराने हातवर वार करुन सात हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरुन नेली. आरोपी काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली.
लवटे याने पर्स सुनिल अर्जुन याच्याकडे देऊन पळून जाऊ लागला.
त्यावेळी नागरिकांनी त्याचा पाठलाग करुन पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुमाने (API Gumane) करीत आहेत.

 

Web Title: Pune Pimpri Crime | Citizens caught a young man who stabbed a woman’s hand and stole her purse; FIR at Chikhli Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबईल नंबर दे’ ! मिठी मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना

Pune Crime | सोन्याच्या चीपचा मोह पडला महागात; सोन्याच्या चीपसाठी मंगळसुत्र केले चोरट्यांच्या हवाली

Pune Crime | दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार्‍यांचे मोबाईल चोरणारी आंध्र प्रदेशातील महिलांची टोळी जेरबंद

 

 

Related Posts