IMPIMP

Pune Pimpri Crime | कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ, डोक्याला बंदूक लावून धमकावणाऱ्या 7 जणांवर FIR

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | फसवून जमीन नावावर करुन घेतल्या प्रकरणी दिवाणी न्यायालयात (Civil Court)
दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ (Abuse) करुन थेट डोक्याला बंदूक (Pistol) लावून धमकावल्याचा प्रकार समोर आला
आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime ) 3 जानेवारी 2018 ते 10 जुलै 2022 या कालावधीत दूय्यम निबंधक कार्यालय मुळशी-2 (Second Registrar
Mulshi-2) आणि माण स्मशानभूमीजवळ (Mana Cemetery) घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत वसंत धोंडीबा साळूंखे Vasant Dhondiba Salunkhe (वय-50 रा. मू.पो. माणगाव, ता. मुळशी) यांनी शुक्रवारी (दि.9) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष अंकूश मोहिते (Santosh Ankush Mohite), किशोर अंकुश मोहिते (Kishore Ankush Mohite), अंकुश किसन मोहिते (Ankush Kisan Mohite), गाडीचा चालक, दोन बॉडीगार्ड व एका अनोळखी व्यक्तीवर IPC 364 अ, 143, 144, 149, 323, 504, 506(2), 406,420 सह आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), अनुसूचित जाती जमाती कायदा (Scheduled Castes and Tribes Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अरुण साळुंखे याच्या मालकीची माणगाव येथे 75 आर जमिन आहे.
या जमिनीचा विकसन करारनामा (Development Agreement) करायचा असल्याचे सांगून संतोष मोहिते याने
कुलमुखत्यार (Chancellor) पत्र केले.
तसेच या कामासाठी फोटो लागत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या कोऱ्या कागदावर सह्या आणि अंगठा घेऊन
फिर्यादी यांची 20 आर जमीन (Land) परस्पर स्वत:च्या नावावर केली.
जमीन नावावर करुन घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना कोणताच मोबदला न देता त्यांची फसवणूक (Fraud) केली. यासंदर्भात फिर्यादी यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
हा दावा मागे घेण्यासाठी आरोपींनी माण स्मशानभुमीजवळ फिर्यादी यांना 10 जुलै 2022 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास आडवून दमदाटी केली.

 

आरोपी संतोष मोहिते व त्याचे वडील अंकूश मोहिते यांच्यासह इतरांनी फिर्यादी यांना गाडीत बसण्यासाठी दबाव आणला.
मात्र फिर्यादी यांनी गाडीत बसण्यास नकार दिला असता संतोष मोहिते याने जातीवाचक शिवीगाळ करुन जाळून
टाकण्याची धमकी (Threats of Burning) दिली.
तर बॉडीगार्डने (Bodyguard) त्यांच्या डोक्याला बंदूक लावून गाडीत बसवले.
निर्जन स्थळी नेऊन फिर्यादी यांना कोर्टातील केस मागे घेण्यासाठी दमदाटी केली.
तसेच केस केल्यामुळे 50 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगून व्याजाचे 10 लाख असे एकूण 60 लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितली.
तसेच पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे (PSI Gadve) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Pimpri Crime | FIR against 7 people who used caste abuse, threatened with gun to head to withdraw case filed in court

 

हे देखील वाचा :

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन ; फुलांची उधळण, कोल्ड फायरची विद्युत अतिशबाजी आणि ढोल ताशाचा दणदणाट

Rain in Maharashtra | संपूर्ण राज्यात पावसाचा ‘येलो’ अलर्ट, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

Police Family On MP Navneet Rana | ‘पोलिसांबद्दल तू नेहमीच अपशब्द वापरतेस, आता माफी माग, नाहीतर…’; नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

 

Related Posts