IMPIMP

Pune PMC News | शहर स्वच्छतेसोबतच प्रकल्प वेळेत पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील – अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.

by sachinsitapure

पुणे :  Pune PMC News | महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) अतिरिक्त आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी. (IAS Prithviraj B P) यांची नियुक्ती झाली असून आज सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. मोठ्या शहरामध्ये काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नागरिकांच्या अडचणी समजावून घेउन त्या सोडविण्यासाठी सर्व घटकांना विश्‍वासात घेण्यात येईल. तसेच महत्वाच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन पृथ्वीराज बी.पी.यांनी केले.(Pune PMC News)

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar) यांची साखर आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी बदलून आलेल्या पृथ्वीराज यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. पृथ्वीराज बी.पी. हे या अगोदररनागपूर स्मार्ट सिटी कंपनीमध्ये सीईओ होते. २०१४ च्या बॅचचे आयएएस असलेल्या पृथ्वीराज यांनी सोलापूर, लातूर आणि परभणी येथे सीईओ आणि जिल्हाधिकारी पदावर काम पाहीले आहे. ते म्हणाले, मागील दहा वर्षांचा प्रवास पाहता पहिल्यांदा मोठया महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. येथे काम करण्यात उत्सुकता तर आहेच परंतू काही आव्हानं देखिल आहेत.

थेट नागरी जीवनाशी संबधित दैनंदनी सुविधां पुरविण्यासाठी नागरी जीवनमान सुकर व्हावे यासाठी अधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येईल. यासोबतच नदीसुधार, नदीकाठ सुधार, चोवीस तास पाणी पुरवठा,
समाविष्ठ गावातील ड्रेनेज व्यवस्था हे सुरू असलेले प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन.
स्वच्छतेमध्ये शहर अग्रेसर राहावे यासाठी विशेष प्रयत्न राहातील, असे पृथ्वीराज यांनी नमूद केले.

Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी चिंचवडमधील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची कारवाई

Related Posts