IMPIMP

Pune Rural Lockdown | …तर पुणे जिल्ह्यातील तब्बल 42 गावात कडक लॉकडाऊन

by nagesh
Pune Rural Lockdown | pune district 42 villages strict lockdown

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Rural Lockdown | मागील दोन महिन्यापूर्वी पुण्यासह (Pune) राज्यात कोरोनाचा वेग वाढत होता. राज्यात असणारा तोच वेग आता आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील काही गावांना आणखी कोरोनाच्या विळख्याने (Corona virus) वेढा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर (bhor), वेल्हे (velhe) आणि पुरंदर (purander) या 3 तालुक्यांचा अपवाद वगळता इतर 10 तालुक्यातील एकूण 42 गावात (42 villages) कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद (ZP) प्रशासनाने ही गावे उच्च धोका गावे म्हणून जारी केलं आहे. या गावात नियमाबरोबर कडक लॉकडाऊन (Pune Rural Lockdown) करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी दिल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

42 या गावांमधील कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजनांबरोबरच सर्वेक्षण, कोरोना चाचण्यांवर जास्त भर दिला जाणार असल्याचं सांगितलं आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील 194 गावातच कोरोना बाधित आढळून येत आहेत. तसेच, 600 हुन जास्त गावे कोरोनामुक्त झालीत. ग्रामीण भागातील 607 गावात गेल्या 3 आठवड्यापासून आजतागायत एकही बाधित सापडला नाही. तसेच या गावांपैकी 96 गावे ही खेड तालुक्यातील आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या (ZP Department of Health) वतीने करण्यात आलेल्या पाहणीतून ही बाब समोर आलीय. 32 गावांपैकी दौंड

 

 

उर्वरित जिल्ह्यातील 31 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाची स्थिती चिंताजनक असलेल्या गावात 10 गावे ही जुन्नर तालुक्यातील आहेत. तसेच, बाकी 32 गावांपैकी दौंड आणि शिरूर तालुक्यातील प्रत्येकी 6, इंदापूर तालुक्यातील- 5, मावळ-4, आंबेगाव आणि खेड प्रत्येकी-3, मुळशी तसेच, बारामती प्रत्येकी – 2 आणि हवेली तालुक्यातील फक्त एका गावाचा समावेश आहे.

 

 

42 गावात ‘या’ प्रमुख गावाचा समावेश –

– मोरगाव (ता. बारामती),

– देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे, केडगाव,

– लिंगाळी, वरवंड (सर्व ता. दौंड),

– बावडा, शेटफळगढे (दोन्ही ता. इंदापूर),

– धोलवड, डिंगोरे, पिंपरी पेंढार (ता. जुन्नर),

– बिरदवडी, खरपूड, कोयाळी (ता. खेड), साळुंब्रे (ता. मावळ),

– मारुंजी, सुस (ता. मुळशी),

– कवठे, केंदूर, कोरेगाव भीमा, पाबळ, सादलगाव, सविंदणे (ता. शिरूर)

 

 

Web Title  : Pune Rural Lockdown | pune district 42 villages strict lockdown

 

 

हे देखील वाचा :

Indigo ची शानदार ऑफर ! केवळ 915 रुपयात करा मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डीसह 63 शहरांचा विमान प्रवास, चेक करा तारीख

PM-Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये, तात्काळ चेक करा डेट

IT Recruitment 2021 | आयटी क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ कंपनीत 10 हजार जागांसाठी भरती होणार

 

Related Posts