IMPIMP

Pune Rural Police | वेषांतर करुन राहणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड, 6 महिन्यापासून होता फरार

by nagesh
pune rural police arrest the accused in the disguised ransom case had been absconding for six months

मंचर : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – लोकांकडून जबरदस्तीने खंडणी वसूल करणाऱ्या सराईत आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) अटक (Arrest) केली आहे. आरोपी दिवा -मुंबई (Diva -Mumbai) येथे वेषांतर करुन रहात होता. आरोपीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) मंचर पोलीस (Manchar) ठाण्यात खंडणीसह (Ransom) एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. मागील सहा महिन्यापासून आरोपी फरार होता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हरीश महादू कानसकर (सध्या रा.दातिवली, दिवा, मुंबई मुळ रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर मंचर पोलीस ठाण्यात खंडणीसह इतर गुन्हे (FIR) दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सहा महिन्यापासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat) यांना आरोपी दातिवली दिवा मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (Assistant Police Inspector Netaji Gandhare) यंच्या पथकाने दातिवली दिवा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. आरोपी दिवा मुंबई येथे वेषांतर (disguises) करुन रहात होता. पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी मंचर पोलीस ठाण्याच्या (Manchar police station) ताब्यात दिले आहे.

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav
Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील (Additional Superintendent of Police Vivek
Patil), उपविभागीय पोलीस अधिकारी लंभाते यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,
सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर, दिपक
साबळे, सचिन गायकवाड, पोलीस नाईक संदिप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : pune rural police arrest the accused in the disguised ransom case had been absconding for six months

 

हे देखील वाचा :

SBI Alert | टळला मोठा फ्रॉड ! 25 लाखांच्या लॉटरीचा WhatsApp मेसेज आल्यानंतर SBI ने ग्राहकाला असे केले अलर्ट

Dieting | वजन वाढल्यास ‘इथं’ सरकार करून घेते डाएटिंग, न केल्यास भरावा लागतो दंड

Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण

 

Related Posts