IMPIMP

Pune Station-Hadapsar Railway Terminal | पुणे स्थानकासाठी 31 कोटी निधी मंजूर; हडपसर टर्मिनलसाठी 21 कोटी

by nagesh
Pune Station-Hadapsar Railway Terminal | 21 crore for hadapsar terminal and 31 crore for pune railway station fund indian railway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Station-Hadapsar Railway Terminal | 2022-2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये (Budget 2022) महाराष्टाच्या रेल्वेच्या वाटेला जवळपास 11 हजार 903 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आता पुण्यातील हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी (Hadapsar Terminus) 21 कोटी, तसेच पुणे स्थानकावरील (Pune Railway Station) यार्ड रिमोल्डिंग आणि फलाटाच्या विस्तारीकरणासाठी साधारण 31 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (Pune Station-Hadapsar Railway Terminal)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला गेला आहे. हा अर्थसंकल्प पुण्यासाठी चांगला ठरला आहे. पुणे-मिरज-लोढा रेल्वे मार्गाच्या (Pune-Miraj-Londa Railway line) दुहेरीकरणासाठी आणि विद्युतीकरणासाठी कॅपिटल व ईबीआर असे मिळून साधारण 1566 कोटी रुपये मंजूर केले गेले आहेत. म्हणून दुहेरीकरणाच्या कामाला आता गती येणार आहे. यामुळे आता पुणे-नाशिक (Pune-Nashik) सेमी हायस्पीड कॉरिडॉरसाठी 1 हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर बारामती-लोणंदसाठीही 1000 कोटी रुपये देऊन हेड खुले केले गेले आहे. (Pune Railway)

 

पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमोल्डिंग आणि फलाटाच्या विस्तारीकरणासाठी साधारण 31 कोटी रुपये मंजूर झालेत.
यामध्ये पुणे स्थानकावरील 2, 3 आणि 6 या क्रमांकाचे फलाट 24 डबे बसतील इतक्या लांबीच्या होतील.
त्यामुळे आता गाड्यांना होम सिग्नलवर (Home Signal) थांबावे लागणार नाही.
त्याचबरोबर पुणे स्थानकावर होणाऱ्या गाड्यांच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी हडपसर टर्मिनल उभे केले जातेय. 3 फलाटांच्या विकासासह 2 नवे स्टेबलिंग लाईन तयार केली जाणार आहे. आणि नवे आरआरआय केबिन (RRI Cabin) तयार करण्याचे नियोजन आहे. या 21 कोटींत हडपसर स्थानकाचे परिवर्तन होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Station-Hadapsar Railway Terminal | 21 crore for hadapsar terminal and 31 crore for pune railway station fund indian railway

 

हे देखील वाचा :

Digital Currency vs Cryptocurrency | क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये फरक काय?, जाणून घ्या

Pune Crime | Thergaon Queen सोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड; पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी अन्…

Nashik Crime | नाशिकमधील धक्कादायक घटना ! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काढला काटा

 

Related Posts