IMPIMP

Pune News : पोवाडा गायला म्हणून शाहीर हेमंतराजे मावळे यांना अटक, मात्र पोलिस ठाण्यात नेल्यानंतर केला सत्कार

by sikandershaikh
Shahir-Hemantraje-Mavale

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. शिवजयंती दिवशी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम ज्यामध्ये पोवडे कार्यक्रम करु नयेत असे आदेश देण्यात आले होते. मात्र शाहीर हेमंतराजे मावळे (hemantraje mavale) यांनी आज (शुक्रवार) पुण्यात लाल महालासमोर पोवाडे गायले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुणे पोलिसांनी हेमंतराजे मावळे यांना अटक केली. दरम्यान, मावळे (hemantraje mavale) यांना फरासखाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला

 

Shahir-Hemantraje-Mavale

Shahir-Hemantraje-Mavale

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने राज्य शासनाने यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार पुण्यात कोठेही कार्यक्रम, रॅली, शोभायात्रा तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी करण्यास पुणे पोलीस प्रशासनाने बंदी घातली होती. या नियमांचे उल्लंघन करुन शाहीर हेमंतराजे मावळे यांनी पुण्यातील लाल महालासमोर पोवाडे गायले. त्यांच्यासोबत त्यांचे इतर साथिदारांनी देखील पोवाडे सादर केले. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी त्याठिकाणी गर्दी केली. मावळे तेथून हटण्यास तयार नसल्याने पोलिसांना त्यांना अटक करावी लागली.

दरम्यान, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडे कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली होती. तसे पत्र त्यांनी राज्य सरकारला पाठवले होते. मात्र, राज्य सरकारकडून त्यांच्या पत्राला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. याचा निषेध करण्यासाठी हेमंतराजे मावळे यांनी आज लाल महालासमोर पोवाडे सादर केले.

Related Posts