IMPIMP

Satara Crime | माजी महिला उपनगराध्यक्षांना मारहाण; भाजपच्या ‘या’ माजी नगरसेवकावर FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara Crime | सातारा (Satara) नगरपालिकेच्या माजी महिला उपनगराध्यक्षांना भाजपचे (BJP) माजी नगरसेवक धनंजय जांभळे (Dhananjaya Jambale) यांनी दमदाटी करून मारहाण आणि धक्काबुक्की केली. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर धनंजय जांभळे यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. (Satara Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?

 

साताऱ्यातील कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी बुधवारी सकाळी रांगोळी काढत होत्या. यावेळी एका माजी उपनगराध्यक्षांचे पती घटनास्थळी आले आणि त्यांनी रांगोळी का काढत आहात, स्वच्छतेचे काम करा असे महिला कर्मचाऱ्यांना सांगितले. हे सगळे भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पाहिले. (Satara Crime)

 

यानंतर धनंजय जांभळे यांना संताप आला आणि त्यांनी त्या ठिकाणी अरेरावी सुरू केली.
काही वेळात संबंधित माजी महिला उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र जांभळे यांनी अरेरावी सुरूच ठेवली. यानंतर जांभळे यांनी दमदाटी करत मारहाण केली असल्याचा आरोप माजी महिला उपनगराध्यक्ष यांनी केला आहे. यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन धनंजय जांभळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा (Crime) दाखल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Satara Crime | Former female deputy president of satara beaten up case registered against former corporator of bjp

 

हे देखील वाचा :

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक

Ajit Pawar | दसरा मेळावे झाले आता सर्वसामान्य जनतेने जो तो काही निर्णय घ्यावा – अजित पवार

LIC Jeevan Pragati Plan | LIC चा हा प्लान तुमच्या 200 रुपयांच्या बचतीवर देईल 28 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा?

 

Related Posts