IMPIMP

IND Vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या T-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना संधी

by amol
ind vs eng india squad paytm t20i series against england announced here full list

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड (IND Vs Eng) संघामध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली. घोषणा करण्यात आलेल्या संघामध्ये युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, राहुल तेवतिया, श्रेयस अय्यर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, इशान किशन या युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय गोलंदाज भुवनेश्वर कुमराचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

 

आज जाहिर झालेल्या संघामध्ये युवा फलंदाज संजू सॅमसन याचा समवेश करण्यात आलेला नाही.
त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारत इंग्लंड विरोधात पाच टी-20 सामने खेळणार आहे.
हे सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो-बबलच्या नियमांनुसार हे सर्व सामने होणार आहेत.
पहिला सामना 12 मार्च तर शेवटचा सामना 20 मार्च रोजी होणार आहे.

सध्या भारत विरुद्ध इंग्लंड (IND Vs Eng) कसोटी मालिका सुरु असून या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे.
तिसरी कसोटी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार असून याच ठिकाणी सराव  होत आहे. या मैदानावर 24 फेब्रुवारी पासून सामन्याला सुरुवात होणार आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी-20 मालिकेसाठीच्या संभाव्य 15 खेळाडूंचा संघ आज घोषित करण्यात आला आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

Pune News : आपल्याच नगरसेवकांना नोटीस पाठवण्याची भाजपवर आली वेळ, जाणून घ्या प्रकरण

Related Posts