IMPIMP

Ashish Shelar | ‘दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत होत नाही पण राणेंच्या बंगल्यात दुर्बिन लावून शोधकार्य’

by nagesh
Ashish Shelar | bjp also do protest againt mahavikas aghadi tomorrow in mumbai says ashish shelar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ashish Shelar | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतील जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई पालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) 15 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. या कालावधीत त्यांनी बंगला हटवणं अपेक्षित आहे नाहीतर महापालिका स्वत: कारवाई करणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेनेची (Shivsena) गेल्या 25 वर्षामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) टेंमकर मुल्ला, पाकमोडिया स्ट्रीट, मेमनच्या अल – हुसैनी बिल्डिंग, मोहम्मद अली रोड, मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर (Illegal Construction) हातोडा उगरण्याची हिंमत नाही. मात्र नारायण राणेंच्या बंगल्यात दुर्बिन लावून शोधकार्य सुरू, असा टोला आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला लगावला आहे.

 

 

नारायण राणे यांच्या बेकायदा बांधकामाच्या तक्रारीनंतर पालिकेने बंगल्याची पाहणी केली.
त्यानंतर 4 मार्चला त्यांना पालिकेने नोटीस (Notice) पाठवली आणि बेकायदा बांधकामाबाबत काही प्रश्न विचारले.
त्यावर बंगल्यातील बांधकाम हे अधिकृत असल्याचा दावा वकिलांनी केला. मात्र पालिकेने हा दावा फेटाळून लावला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, आशिष शेलार यांनी दाऊदच्या प्रॉपर्टीचा दाखला देत शिवसेनेवर निशाणा साधला.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना दाऊदसोबत मनी लॉन्ड्रिंगच्या (Money Laundering Case) प्रकरणात ते तुरूंगात आहेत. शेलारांनी या प्रकरणाचा धागा पकडत शिवसेनेवर टीका केली.

 

Web Title :- Ashish Shelar | narayan rane i dont dare take action on dawoods building but by putting binoculars on ranes bungalow ashish shelar on shiv sena

 

हे देखील वाचा :

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

IPL 2022 | …म्हणून MNS ने फोडल्या आयपीएलच्या बसेस; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | 45 वर्षीय ‘चाचा’कडून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! भाजपचा ‘हा’ नेता येणार अडचणीत ?

 

Related Posts