IMPIMP

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

by pranjalishirish
Mansukh Hiren ATS's 'Crime Scene' Demonstration on Mansukh Hiren 's Death

मुंबई  : मनसुख हिरेन Mansukh Hiren  याच्या मृत्यूप्रकरणी एटीएस तपास करीत आहे. ता. १०, आणि ११ मार्चच्या राञी एटीएसच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर येथे ‘क्राइम सीन’ चे प्रात्याक्षिक केले. यावेळी एटीएसचे अधिकारी आणि न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे अधिकारीही उपस्थित होते.

मनसूख Mansukh Hiren यांनी आत्महत्या केली त्यादिवशी (ता. ४ व ५) भरती आणि ओहटीची वेळ काय होती, याचा तपास करण्यात येत आहे. ता. १० आणि ११ मार्चच्या मध्यराञी भरती आणि ओहटीची वेळ सारखी असल्याने एटीसच्या पोलिसांनी या दिवशी ‘क्राइम सीन’ चे प्रात्याक्षिक केल्याचं समजते.

 

मृतदेह सापडलेल्या परिसरात कांदळवनाचा झाडं आहेत. त्यामुळे मृतदेह वाहत पुढे जाणं शक्य नसल्याचं तेथील स्थानिकांच मत आहे. आरोपीने हिरेन यांचा मृतदेह फेकला. त्यावेळी ओहटी असल्याने त्यांचा मृतदेह हा पाण्यातून वाहून न जाता, गाळात रुतल्याचं निरीक्षण नोंदविले गेलं आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केले होते.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts