IMPIMP

औषधांचा अवैध साठा प्रकरण : गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी, दिल्ली उच्च न्यायालयाचे कारवाईचे निर्देश

by omkar
Gautam Gambhir | former indian cricketer and bjp mp gautam gambhir received death threats email from isis kashmir says delhi police DCP central Shweta Chauhan

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात राजधानी दिल्लीत गंभीरने कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या औषधांचे वाटप केले होते. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी औषध महानियंत्रकांनी गौतम गंभीर (Gautam Gambhir) फाऊंडेशन औषधांच्या अवैध साठेबाजी, वितरण प्रकरणात दोषी असल्याचे म्हणत या प्रकरणी फाऊंडेशन तसेच विक्रेत्याविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

त्यामुळे या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी 29 जुलैला होणार आहे.

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक ! 18 जिल्हे पूर्णपणे Unlock

राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्यावेळी अनेक रुग्णालयांमध्ये औषधे आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. अशावेळी खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यासह काही भाजप नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करून दिले होते.
यासाठी अवैध पद्धतीने ऑक्सिजन सिलिंडर, फॅबिफ्लू, रेमडेसिविर आदी औषधांचा साठा करून ते नागरिकांना उपलब्ध करून दिल्याचे समोर आले होते.
या प्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी या चौकशीच्या अहवालात आरोपींना क्लिन चीट देण्यावरून न्यायालयाने औषध महानियंत्रकांवर चांगलेच ताशेरे ओढले होते.

अहवाल सादर करण्याचे निर्देश

ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत आमदार प्रवीण कुमार अशाच प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळले आहेत, अशी माहितीही औषध नियंत्रकांनी उच्च न्यायालयात दिली आहे.
औषध नियंत्रकांनी या प्रकरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Also Read:- 

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

 

Related Posts