IMPIMP

Earn Money | फायद्याची गोष्ट ! 110 रुपये खर्च करुन दरमहिना Bank Account मध्ये येतील ‘इतके’ हजार रुपये, जाणून घ्या

by nagesh
Bank Interest Rate | in these four government banks offering highest interest on savings account see how much is earned

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | तुम्ही पीएम किसान सम्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण सरकार अशा पात्र व्यक्तींना मोठा फायदा देत आहे. सरकार या योजनेत सहभागी शेतकर्‍यांना 3000 रुपये महिना म्हणजे वार्षिक 36000 रुपये पेन्शन (Earn Money) देत आहे.

 

वय 60 वर्षापेक्षा जास्त असलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळेल.
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे. मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्रे देण्याची गरज नाही.
खिशातून खर्च न करता तुम्ही वार्षिक 36000 मिळवू शकता.

 

पीएम किसान स्कीमचा लाभ घेणारे शेतकरी मानधन योजना अतंर्गत आपल्यासाठी पेन्शनची व्यवस्था सुद्धा करू शकतात.
पीएम किसान प्रमाणेच मानधन योजनासुद्धा छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी आहे.
मानधन स्कीम अंतर्गत शेतकर्‍यांसाठी सरकार पेन्शनची व्यवस्था करते.
यासाठी शेतकर्‍यांना दर महिना एक रक्कम भरावी लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पीएम किसान सम्मान निधी स्कीममधील शेतकर्‍यांना योजनेत (Kisan Maan Dhan Yojana) सहभागी होणे खुप सोपे आहे.
कारण मानधन योजनेत अशा शेतकर्‍यांचे रजिस्ट्रेशन डायरेक्ट केले जाते.
यात सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र द्यावी लागत नाहीत.
मानधन योजनेंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर शेतकर्‍यांना दरमहिना पेन्शन म्हणून 3000 रुपये मिळतील.

 

जर एखाद्या शेतकर्‍याची इच्छा असेल तर मानधन योजने (Kisan Maan Dhan Yojana) साठी अंशदान पीएम किसान स्कीम अंतर्गत मिळणार्‍या रक्कमेतून कापली जाईल.
शेतकर्‍याला आपल्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत.

 

18-40 वयोगटातील लोक यासाठी अर्ज करू शकतात. 2 हेक्टर किंवा यापेक्षा कमी कृषी योग्य जमीन असणारे शेतकरी या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतात.
जर लाभार्थ्याचा काही कारणामुळे मृत्यू झाला तर योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन लाभार्थ्याच्या पत्नीला मिळेल. मात्र पेन्शनची रक्कम अर्धी म्हणजे 1,500 रुपये असेल.

 

योजनेंतर्गत किमान 20 वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक अंशदान करावे लागेल.
18 वर्षाच्या वयात सहभागी झाल्यास मासिक अंशदान 55 रुपये महिना असेल.
जर 30 वर्ष वयात योजनेत सहभागी झाल्यास 110 रुपये दरमहिना अंशदान करावे लागेल.

 

Web Title : Earn Money | every month after spending 110 rupees so many thousand rupees will come

 

हे देखील वाचा :

e-Shram | ई-श्रम कार्डसाठी तात्काळ करा ‘अप्लाय’, काही समस्या असेल तर टोल फ्री नंबरवर करा कॉल; जाणून घ्या

Rape Case | महाराष्ट्रात ‘खो-खो’ खेळलेल्या खेळाडूवर बलात्कार, रेल्वे ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’च्या टीमला धक्का ! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

 

Related Posts