IMPIMP

EPFO-EDLI Scheme | ईपीएफओ मेंबर्सला ईडीएलआय योजनेची ‘ही’ सर्व वैशिष्ट्य माहिती असणं अत्यंत गरजेचं , जाणून घ्या

by nagesh
EPFO-EDLI Scheme | epfo edli scheme epfo members should know all these features of edli scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  EPFO-EDLI Scheme | कर्मचारी जमा लिंक विमा किंवा ईडीएलआय योजना, 1976 (EPFO-EDLI Scheme) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) द्वारे संचालित सर्वात महत्वाची योजना आहे. ईपीएफओच्या नियमानुसार, एक भविष्य निर्वाह निधी (PF) खातेधारक कोणताही प्रीमियम न भरता 7 लाख रुपयांपर्यंतच्या जीवन विमा लाभासाठी पात्र आहे.

एकदा पीएफ (PF Account) किंवा ईपीएफ खाते (EPF Account) उघडल्यानंतर सर्व ईपीएफओ सदस्य या ईडीएलआय (EDLI) लाभासाठी पात्र आहेत.
या जीवन विमा लाभासह, ईडीएलआय योजनेची इतर काही (EPFO-EDLI Scheme) वैशिष्ट्य सुद्धा आहेत जी एक पीएफ खातेधारकांना माहिती असावीत.
EPFO सदस्यांना EDLI योजनेची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी, EPFO ने अलिकडेच आपल्या योजनेबाबत ट्विट करत कर्मचार्‍यांना जमा लिंक विमा योजना, 1976 च्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे.
ईपीएफओ-ईडीएलआय योजनेची वैशिष्ट्य जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कमाल खात्रीशीर लाभ (Maximum guaranteed benefits)

सेवेच्या दरम्यान मृत्यू झाल्यास ईपीएफ सदस्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला कमाल 7 लाख रुपयांपर्यंत लाभ (EPFO-EDLI Scheme) दिला जाईल.
ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) ने 9 सप्टेंबर 2020 ला EDLI योजनेंतर्गत कमाल विमा रक्कम वाढवून 7 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला होता.

किमान खात्रीशीर लाभ (minimum guaranteed benefit)

ईडीएलआय योजना 1976 अंतर्गत, जर मृत सदस्य आपल्या मृत्यूच्या 12 महिने अगोदर सतत नोकरीत असेल तर किमान लाभ 2.5 लाख रुपये आहे.
कर्मचार्‍यांकडून कोणतेही योगदान नाही ईपीएफमध्ये कर्मचार्‍याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम जमा होते. एम्प्लॉयर सुद्धा 12 टक्के जमा करतो परंतु ती दोन भागात जमा होते.
कंपनी 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा करते.
या स्कीममध्ये कर्मचार्‍याला कोणत्याही प्रकारचे योगदान द्यावे लागत (EPFO-EDLI Scheme) नाही.

 

ऑटो नॉमिनेशन (Auto Nomination)

पीएफ किंवा ईपीएफ खातेधारकांसाठी ऑटो नॉमिनेशन तरतूद आहे.
एकदा पीएफ किंवा ईपीएफ खाते उघडल्यानंतर सर्व ईपीएफओ सदस्य या ईडीएलआय लाभासाठी पात्र आहेत.

पीएफ अकाऊंटमध्ये आले व्याज

EPFO ने आर्थिक वर्ष 2020-21 चे व्याज क्रेडिट करणे, म्हणजे खात्यात टाकण्यास सुरूवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी सबस्क्रायबर्सच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
तुम्ही सुद्धा तुमचा पीएफ बॅलन्स चेक करू शकता. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवा.
रजिस्टर्ड मोबाइल नंबरपासून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफओकडून एक संदेश मिळेल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची डिटेल मिळेल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : EPFO-EDLI Scheme | epfo edli scheme epfo members should know all these features of edli scheme

 

हे देखील वाचा :

Pune News | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात विविध विकास कामांच्या कार्यक्रमांचे आयोजन

CM Uddhav Thackeray | मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कठोर, दिले ‘हे’ स्पष्ट आदेश

Pune Corona | दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही; 118 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts