IMPIMP

Instsnt Loan Portal | छोट्या व्यापार्‍यांना 50 लाखापर्यंत कर्ज मिळेल अवघ्या 30 मिनिटात, जाणून घ्या कसे ?

by nagesh
Instsnt Loan Portal | federal bank launch instsnt 30 minutes loan approval portal for msmes

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – Instsnt Loan Portal | देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळणार आहे. फेडरल बँकेने (Federal Bank) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) ऑनलाइन कर्ज सुविधा देण्यासाठी एक व्यासपीठ सुरू केले आहे. (Instsnt Loan Portal)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फेडरल बँकेने दावा केला आहे की छोट्या व्यावसायिकांना 30 मिनिटांत 50 लाख रुपयांचे कर्ज federalinstaloans.com वर मिळेल. बँकेचे म्हणणे आहे की, त्यांचे व्यासपीठ अल्गोरिदम वापरून कर्ज घेण्यासाठी व्यावसायिकाने अपलोड केलेली कागदपत्रे पटकन कॅप्चर करते. यामुळे वेळेची बचत होते आणि कर्ज सेवा देण्यासाठी कमी वेळ लागतो.

कर्जासाठी अर्ज करण्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही, असे फेडरल बँकेचे म्हणणे आहे. ते कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदाराने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्राप्तीकर रिटर्न (ITR), बँक खाते विवरण आणि वस्तू आणि सेवा कर (GST) तपशील अपलोड करणे आवश्यक आहे.

कर्जाच्या अर्जातही फारच कमी माहिती द्यावी लागेल. याचे कारण असे की अपलोड केलेल्या दस्तऐवजांमधून बहुतेक तपशील स्वयंचलितपणे भरले जातील जसे की GST, ITR आणि बँक खाते तपशील. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. कर्जदाराला कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागेल. (Instsnt Loan Portal)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फेडरल बँकेची उपकंपनी IPO लाँच करण्याच्या तयारीत

फेडरल बँकेच्या बोर्डाने त्यांची उपकंपनी Fedbank Financial Services (FedFina) च्या आयपीओ प्रक्रियेस मान्यता दिली आहे. Fedfina ही किरकोळ व्यवसाय करणारी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे.

 

 

Web Title : Instsnt Loan Portal | federal bank launch instsnt 30 minutes loan approval portal for msmes

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | चिंताजनक ! पिंपरी चिंचवड शहरात 11 दिवसात 1 हजार मुलांना ‘कोरोना’ची लागण

Pune Crime | बनावट फेसबुक अकाऊंटवर महिलेची बदनामी अन् आत्महत्येची धमकी; बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास

Vodafone-Idea | BSNL ला विक्री करणारे सरकार व्होडाफोन आयडियाचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनेल, टाटा टेलीमध्येही पार्टनर

 

Related Posts