IMPIMP

Maharashtra Police | दुर्देवी ! जीममध्ये व्यायाम करताना सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

by nagesh
Maharashtra Police | Unfortunate! Assistant Commissioner of Police Suhas Bhosale passes away

सोलापूर न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) सोलापूर शहर (Solapur City) पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त सुहास भोसले (Assistant Commissioner of Police Suhas Bhosale) यांचे बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झाले आहे. ते सकाळी ऑफिसर जीममध्ये (officer gym) व्यायामासाठी गेले असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त भोसले सर्वांना परिचीत होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून महाराष्ट पोलिसांच्या (Maharashtra Police) सोलापूर पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले (Assistant Commissioner of Police Suhas Bhosale) हे सोलापूर शहर पोलिस (Solapur City Police) दलात डिव्हिजन -1 या ठिकाणी कर्तव्यास होते. त्यांचे कार्यालय जेलरोड पोलिस स्टेशनमध्ये आहे. अमरावतीहून सोलापूर शहर पोलिस दलामध्ये ते 1 एप्रिल 2021 रोजी रूजू झाले होते. त्यांचे वय 56 होते. सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

 

 

नेहमीप्रमाणे भोसले हे बुधवारी सकाळी शहरातील ऑफिसर जीमध्ये (officer gym) व्यायामासाठी गेले होते. त्यांना व्यायाम करताना चक्कर आली होती.
त्यानंतर त्यांनी काही वेळ व्यायाम करण्याचे थांबविले होते.
अत्यल्प विश्रांतीनंतर लागलीच त्यांनी व्यायामास सुरूवात केली.
त्यावेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
वयाच्या 56 व्या वर्षी सहाय्यक आयुक्त सुहास भोसले (Assistant Commissioner of Police Suhas Bhosale) यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

 

 

Web Title : Maharashtra Police | Unfortunate! Assistant Commissioner of Police Suhas Bhosale passes away

 

हे देखील वाचा :

Crime News | माहेरी गेलेली पत्नी घरी यावी म्हणून लहान मुलांच्या जीवाशी अघोरी कृत्य, बाप ‘गोत्यात’

Maharashtra Mantralaya | मंत्रालयातील तळीरामांना शोधण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Indian Railways | IRCTC ने ऑनलाइन ट्रेन तिकिट बुकिंगचे ‘हे’ नियम बदलले, करावे लागेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

 

Related Posts