IMPIMP

EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठा दिलासा ! UAN-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या

by nagesh
EPFO | epfo warns never make such mistakes or else there may be a big loss of money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) EPF अकाऊंट आधारसोबत लिंक करण्याच्या बाबतीत सबस्क्रायबर्सला थोडा दिलासा दिला आहे. लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 डिसेंबर केली आहे. यापूर्वी यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती.  EPFO ने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

 

तुम्ही 31 डिसेंबरपर्यत EPFO आणि आधार नंबर लिंक केले नाही तर तुमच्या खात्यात कंपनीकडून होणारे योगदान रोखले जाईल. EPF अकाऊंटमधून पैसे काढता येणार नाहीत. तसेच EPFO च्या सेवांचा वापर करता येणार नाही.

 

 

PF Account सोबत Aadhaar असे करा Link –

– सर्वप्रथम https://unifiedportal mem.epfindia.gov.in/memberinterface/ लिंकवर क्लिक करा.

– आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

– यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC Option सिलेक्ट करा.

– अकाऊंटसोबत आधारला लिंक करण्याचे अनेक डॉक्युमेंट्स दिसतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

– आधार ऑपशनवर क्लिक करा, आधार नंबर आणि नाव टाईप करून Service वर क्लिक करा.

– यानंतर माहिती सुरक्षित होईल आणि आधार UIDAI सोबत डाटा व्हेरीफाय होईल.

– KYC कागदपत्र योग्य असल्यास आधार EPF अकाऊंटसोबत लिंक होईल. Verify लिहून येईल.

 

 

 ऑफलाइन असे करा लिंक –

– Aadhaar Seeding Application फॉर्म भरा.

– मागिलेल्या सर्व डिटेल्ससह फॉर्ममध्ये UAN आणि Aadhaar नोंदवा.

– फॉर्मसोबत यूएएन, पॅन आणि आधारची सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडा.

– हे ईपीएफओ किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आऊटलेच्या कोणत्याही फील्ड ऑफिसमध्ये जमा करा.

– प्रॉपर व्हेरिफिकेशननंतर आधार ईपीएफ अकाऊंटसोबत जोडले जाईल.

– यासंबंधीचा मेसेज रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल.

 

 

UAN नंबर काय आहे?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO) नोंदणीकृत होताच, कर्मचारी या संस्थेचा सदस्य बनतो आणि यासोबत त्याला 12 अंकी UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) देखील जारी केला जातो. या क्रमांकाच्या मदतीने ईपीएफओच्या सुविधा ऑनलाइन वापरता येतील. यूएएन नंबरच्या मदतीने, कर्मचारी त्याच्या पीएफ खात्याचे पासबुक ऑनलाइन पाहू शकतो.  त्याचा पीएफ (प्रोव्हिडंड फंड) शिल्लक ऑनलाईन देखील तपासू शकतो.

 

Web Title : EPFO | epfo subscribers last date for linking uan aadhaar extended till 31 december

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गणेश मूर्ती विक्री दुकानातून महिलेने केले 50 हजार रुपये लंपास

Health Tips | धमण्यांमध्ये तयार होणारे प्लाक हृदय आणि मेंदूसाठी धोकादायक, ते टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या

Gujrat New CM | गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण ? चर्चेला पूर्ण विराम, भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

 

Related Posts