IMPIMP

Gold Price Today | सोने पुन्हा झाले 47 हजारी, चांदी 766 रुपयांनी महागली, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold price gains to rupees 46992 per 10 gram and silver also jumped to rupees 66926 dollar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज 4 ऑगस्ट 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) तेजीचा कल होता. यामुळे सोने आज पुन्हा 47 हजारी झाले. तर, चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) सुद्धा आज तेजी नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,869 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 66,160 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्यात तेजीचा कल होता, तर चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सोन्याची नवीन किंमत

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात 123 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली.
यामुळे सोने 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचले.
दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन भाव आज 46,992 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून
बंद झाला.
अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज कमी होऊन 1,815 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

 

चांदीचा नवीन भाव

चांदीच्या किंमतीत आज तेजी दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 766 रुपयांच्या तेजीसह 66,926 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 25.71 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

 

सोन्याच्या किंमतीत का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्याने भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. सोबतच न्यूयॉर्कमधील कमोडिटी एक्सचेंजमध्ये हाजिर भाव वाढल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर वाढले.

 

 

Web Title : Gold Price Today | gold price gains to rupees 46992 per 10 gram and silver also jumped to rupees 66926 dollar

 

हे देखील वाचा :

Pune Rural Lockdown | …तर पुणे जिल्ह्यातील तब्बल 42 गावात कडक लॉकडाऊन

Indigo ची शानदार ऑफर ! केवळ 915 रुपयात करा मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डीसह 63 शहरांचा विमान प्रवास, चेक करा तारीख

PM-Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये, तात्काळ चेक करा डेट

 

Related Posts