IMPIMP

IND Vs NZ Test Series | गंभीरने ‘या’ दिग्गज खेळाडूवर साधला निशाणा; म्हणाला – ‘नशीब चांगलं म्हणून तो अजून टीममध्ये’

by nagesh
ind vs nz test series gautam gambhir feels ajinkya rahane is fortunate to be still in the team marathi news

कानपूर : वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (IND Vs NZ Test Series) विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (IND Vs NZ Test Series) कानपूरला रवाना झाली आहे. 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये (Kanpur) पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे. टी-20 टीमचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) या सिरीजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे तर विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) पहिली टेस्ट खेळणार नाही, त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) टीमचं नेतृत्व करणार आहे. अजिंक्य रहाणेसाठी ही सीरिज अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण इंग्लंड दौऱ्यामध्ये रहाणेची कामगिरी निराशाजनक झाली होती, यानंतर त्याला टीममधून बाहेर करण्याची मागणी करण्यात आली पण तरीही न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रहाणेची निवड झाली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यावरून आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) अजिंक्य रहाणेवर जोरदार निशाणा साधला आहे.
‘रहाणेचं नशीब चांगलं म्हणून तो अजूनही टीममध्ये आहे.
टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याची आणखी एक संधी त्याला मिळाली आहे.
मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला खेळले पाहिजेत.
शुभमन गिलला (Shubhaman Gill) चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली पाहिजे,’ असे गौतम गंभीर म्हणाला.

मागच्या दोन वर्षांमध्ये रहाणेच्या कामगिरीमध्ये सातत्याने अभाव पाहायला मिळत आहे. 2019 पासून रहाणेने 40 टेस्टमध्ये 7 अर्धशतकं आणि 3 शतकं केली आहेत.
वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात (Australia) ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजय मिळवला, त्या टीमचा रहाणे कर्णधार होता.
त्या दौऱ्यातील मेलबर्न टेस्टमध्ये (Melbourne Test) रहाणेने शतक केलं होतं, यानंतर त्याला मोठा स्कोअर करता आला नाही.
यानंतर इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली तेव्हा रहाणेने 4 टेस्टमध्ये फक्त 112 रन केल्या.
लॉर्ड्स येथील टेस्टमध्ये अर्धशतकी खेळी केल्यानंतर रहाणेला एकदाही 20 रनपेक्षा जास्त स्कोअर करता आला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :  ind vs nz test series gautam gambhir feels ajinkya rahane is fortunate to be still in the team marathi news

 

हे देखील वाचा :

IND Vs NZ Test Series | टी-20 सीरिजमध्ये फेल तरीसुद्धा विराटच्या चौथ्या क्रमांकावर खेळणार ‘हा’ खेळाडू

Amboli Girls Dance Party | आंबोलीच्या एका हॉटेलमधील पार्टीत नाचवल्या मुली; पोलिसांची धाड, दारुसाठा जप्त

Parambir Singh | काय सांगता ! होय, परमबीर सिंग फरार, जुहूमधील फ्लॅटच्या दरवाज्यावर न्यायालयाची ऑर्डर

 

Related Posts