IMPIMP

T20-ODI Captaincy | T20 विश्वचषकानंतर विराट कोहली सोडणार कर्णधारपद, रोहित शर्मा सांभाळणार भारतीय संघाची सूत्रे – रिपोर्ट

by nagesh
T20-ODI Captaincy | virat kohli to quit t20 odi captaincy after t20 wc rohit sharma to takeover big announcement soon says report

नवी दिल्ली : वृत्तसंस्था T20-ODI Captaincy | ज्याचा अंदाज खुप अगोदरपासून वर्तवला जात होता. तसेच काही माध्यमांची वृत्त ज्या गोष्टीकडे इशारा करत होती, ते आता होणार आहे. नवीन वृत्तानुसार ही बातमी पक्की आहे. विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय आणि T20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा (T20-ODI Captaincy) देणार आहे. वृत्तानुसार हा बदल T20 विश्वचषकानंतर दिसू शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वृत्त आहे की, विराटच्या जागी रोहितला (Rohit Sharma) छोट्या स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार लवकरच विराट कोहलीच्या ठिकाणी रोहित शर्माला एक दिवसीय आणि T20 चा कर्णधार बनवण्याची घोषणा होऊ शकते.

 

रोहितला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली आहे त्याने क्रिकेटमध्ये आपली कामगिरी दाखवून दिली आहे. तो IPL चा सुद्धा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. T20 विश्वचषकानंतर भारतीय संघाची सूत्रे सांभाळण्यापूर्वी रोहित IPL 2021 मध्ये नेतृत्व करताना दिसेल.

 

टाइम्स ऑफ इंडियाने BCCI सूत्रांच्या संदर्भाने लिहिले आहे की, T20 विश्व चषकांनतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा विराट कोहली स्वतः करेल. हा निर्णय तो आपल्या फलंदाजीवर फोकस करण्यासाठी घेईल.

 

सूत्रांनी सांगितले की, विराट, जो सध्या सर्व प्रकारात भारतीय संघाचा कर्णधार आहे, त्याने रोहितसोबत आपल्या नेतृत्वाची जबाबदारी विभागण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी InsideSport.co ने सुद्धा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान ही बातमी दिली होती की, विराट कोहली रोहित शर्मासाठी एक दिवसीय आणि टी20 चे कर्णधारपद सोडू शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आता त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. नवीन वृत्तानुसार कोहली आणि संघ व्यवस्थापनाने छोट्या स्वरूपातील क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माला देण्यासाठी मनाची तयारी केली आहे.

 

 

विराटने निर्णयाबाबत बीसीसीआयला दिली माहिती – वृत्त

वृत्तानुसार, विराट कोहलीने आपल्या निर्णयाची माहिती बीसीसीआयला दिली आहे. आणि, रोहित शर्माला सुद्धा याबाबत सूचित केले आहे.

 

विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी 65 कसोटी, 95 एकदिवसीय आणि 45 टी20 सामन्यांमध्ये
कर्णधारपद सांभाळले आहे. यामध्ये त्याने 38 कसोटी जिंकल्या, 65 एकदिवसीय सामने जिंकले आणि 29 टी20 सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे.

 

एकदिवसीय आणि टी20 मध्ये विराट कोहलीचे स्थान घेण्यासाठी रोहित शर्मा सर्वात योग्य दावेदार आहे.
त्याच्याकडे छोट्या स्वरूपातील क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा, सामना जिंकण्याचा आणि संघाला विजेता
करण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएल विजेता बनवले आहे. त्याने आतापर्यंत 5
हंगामात आयपीएल फ्रेंचायजी मुंबईची सूत्रे सांभाळली आहेत.

 

Web Title : T20-ODI Captaincy | virat kohli to quit t20 odi captaincy after t20 wc rohit sharma to takeover big announcement soon says report

 

हे देखील वाचा :

High Security Number Plate | कामाची गोष्ट ! तुमच्या वाहनावर नसेल ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’, तर ‘या’ 11 कामांमध्ये येईल अडथळा; जाणून घ्या

Gangajal | ‘कोरोना’च्या उपचारात परिणामकारक ठरू शकते ‘गंगाजल’, काशी हिंदू विद्यापीठाच्या (BHU) तज्ज्ञांनी केला दावा

High Court | पत्नी छळ करत असेल तर पतीला निश्चितपणे वेगळे होण्याचा अधिकार – हाय कोर्ट

 

Related Posts