IMPIMP

Pune Crime | पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करुन लुटले

by nagesh
Pune Crime | Driver demands body comfort from 28-year-old woman on road, youth from Bibwewadi

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पुण्यात गोळीबार (Pune Crime) करुन एका व्यावसायिकाला लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरवारी (दि.5) रात्री दहाच्या सुमारास उरळी देवाची (uruli devachi) येथे घडली आहे. पुण्यात गोळीबाराच्या (Pune Crime) घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

खंडु भिकाजी बाळसराफ Khandu Bhikaji Balsaraf (वय-53 रा. शिंदेवस्ती, जुना पालखी रोड, उरळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी 20 ते 30 वयोगटातील तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत.
त्यांची उरुळी देवाची येथील जूना पालखी रोड येथे राज ट्रेडिंग कंपनी (Raj Trading Company) आहे. तसेच आयस्क्रीम गोडाऊन आहे.
गुरुवारी रात्री काही कामानिमित्त ते गोडावूनमध्ये गेले होते.
त्यावेळी 20 ते 30 वयोगटातील तीन अनोळखी व्यक्ती रात्री 10 च्या सुमारास गोडावूनमध्ये आले.
त्यांनी पिस्तूल (Pistol) आणि कोयत्याचा धाक दाखवला. तसेच शिवीगाळ केली.
एकाने पिस्तूलातून जमिनीवर गोळी (Firing) झाडत त्यांच्याकडे असलेली 20 ग्रॅम सोन्याची अंगठी (Gold ring), रोख रक्कम, तीन मोबाईल असा एकूण 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एन.एस. निंबाळकर (PSI N.S. Nimbalkar) करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | In Pune, a businessman was shot and robbed

 

हे देखील वाचा :

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण

Pune News | विविध मागण्यांसाठी होमगार्डचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा, वर्षा बंगल्याबाहेर करणार ठिय्या आंदोलन

Chandrakant Patil And Raj Thackeray | ‘युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता’; भाजपाकडून स्पष्ट

 

Related Posts