IMPIMP

Chandrakant Patil And Raj Thackeray | ‘युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता’; भाजपाकडून स्पष्ट

by nagesh
Chandrakant Patil And Raj Thackeray | no proposal of bjp and mns going together chandrakant patil meet raj thackeray

मुंबई न्यूज (Mumbai News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  Chandrakant Patil And Raj Thackeray | मागील काही दिवसापासुन मनसे आणि भाजप (MNS and BJP) युतीची चर्चा राजकिय वर्तुळात जोर धरू लागली आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट झाली. या भेटीवरून राजकरणात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर (Krishnakunj) त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी बोलले आहेत. ‘आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर, ‘युतीचा कोणताच प्रस्ताव या बैठकीत नव्हता. हे दोन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील असे कुठलेच विचार आता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ‘भाषण मी ऐकलं तरी काही शंका होत्या त्या दूर करण्यासाठी आलो होतो, असं ते म्हणालेत. दोन भूमिका असतात.
माणूस म्हणून त्यांना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं होतं, असे ते म्हणाले.
प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. युतीसाठी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही. परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी चर्चा केली.
जेव्हा ते बोलतात त्यात उत्तर भारतीयांना कटुता असल्यासारखे वाटते
त्या भूमिकेबाबत राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. असे ते म्हणाले.

 

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, मनसे-भाजप (MNS and BJP) युतीचा कसलाही प्रस्ताव नाही.
नाशिक दौऱ्यावेळी राज ठाकरेंशी अनपेक्षित भेट झाली होती.
त्यांनी निवासस्थानी घेऊन भेटण्याचं निमंत्रण दिलं होतं.
म्हणून ही फक्त सदिच्छा भेट होती, असे देखील त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील आज रात्री दिल्लीसाठी
(Delhi) रवाना होत आहेत.
महत्वाच्या भेटीसाठी ते रवाना होणार आहेत असे समजते.
तसेच, मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आज मुलाखती घेणार आहेत.
यासाठी भेटीनंतर राज ठाकरे यांचा आज पुणे (Pune) दौरा आहे.

 

 

Web Title : Chandrakant Patil And Raj Thackeray | no proposal of bjp and mns going together chandrakant patil meet raj thackeray

 

हे देखील वाचा :

Manisha Kayande | ‘अमृता फडणवीसांना सध्या कोणतेही काम नाही, BJP ने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी’

Pune Rural Police | लातूर ते मुंबई एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune lockdown | कोरोनाच्या निर्बंधामुळे पुण्यात दररोज 50 कोटींचे नुकसान?

 

Related Posts