IMPIMP

Pune News | विविध मागण्यांसाठी होमगार्डचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा, वर्षा बंगल्याबाहेर करणार ठिय्या आंदोलन

by nagesh
pune news home guards pune to mumbai foot march for various demands sit in agitation outside varsha bungalow

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–   विविध मागण्यांसाठी होमगार्ड रस्त्यावर उतले असून राज्यातील अनेक होमगार्ड पुण्यात (Pune News) जमले आहेत. पुण्याहून (Pune News) मुंबईच्या वर्षा बंगल्यावर (varsha bungalow) पायी मोर्चा (Home Guard Morcha) काढण्यात येणार आहे. तसेच वर्षा बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. होमगार्डचा मोर्चा बसव प्रतिष्ठानचे (Basav Pratishthan) अध्यक्ष रामलिंग काशिनाथ पुराने (Ramaling Purane) यांच्या मार्गदर्शनाखील निघणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

जाचक अटी लावून विविध कारणांनी अपात्र होमगार्डना त्वरित विनाअट कामावर रुजू करुन घेऊन कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे. त्याच बरोबर पोलीस भरतीत (Police recruitment) 3 टक्के आरक्षणावरुन 15 टक्के करण्याच्या मागणीसह होमगार्डना वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत वाढवून मिळावी. तसेच पोलिस प्रशासनाप्रमाणे विमा कवच देण्यात यावं, आत्महत्या व अपघातात मयत झालेल्या होमगार्डना तात्काळ मदत जाहीर करावी अशा विविध मागण्या घेऊन होमगार्ड मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

 

 

राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. या
सदंर्भात राज्यपाल यांचीही भेट घण्यात आली होती. गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil)
यांच्या सोबत 8 जून रोजी व्हीसी मिटिंगमध्ये विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि निर्णय झाला. मात्र,
अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शुक्रवार (दि. 6) पासून पुणे ते मुंबई पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहे. जो पर्यंत शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. तसेच पोलिसांची परवानगी मिळो अथवा न मिळो आंदोलन करणार, असे बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी सांगितले.

 

Web Title : pune news home guards pune to mumbai foot march for various demands sit in agitation outside varsha bungalow

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil And Raj Thackeray | ‘युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता’; भाजपाकडून स्पष्ट

Manisha Kayande | ‘अमृता फडणवीसांना सध्या कोणतेही काम नाही, BJP ने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी’

Pune Rural Police | लातूर ते मुंबई एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts