IMPIMP

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण

by nagesh
khel ratna award will hereby be called the major dhyan chand khel ratna award narendra modi gives reason

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Khel Ratna Award | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं (Khel Ratna Award) नाव बदलल्याची घोषणा केली. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyanchand Khel Ratna Award) म्हणून ओळखलं जाणार आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत याबाबत माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. मात्र, हे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) हे नाव बदलण्या मागील कारण देखील सांगितलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी प्रथम केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. ‘मला देशभरातील नागरिकांनी अनेकदा खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मी त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्याचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करुन यापुढे खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल, असं पंतप्रधान मोदींनी प्रथम केलेल्या ट्विटमधून म्हटले आहेत.

 

 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दुसरं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मेजर ध्यानचंद हे भारतातील आघाडीचे खेळाडू होते. त्यांनी देशाला भरपूर मान मिळवून दिला. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांचं नाव देणं योग्य ठरेल, असं म्हणत ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ (Major Dhyanchand Khel Ratna Award) या नावावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) शिकामोर्तब केले आहे.

 

 

खेलरत्न पुरस्कार कधी सुरु झाला?

1991-1992 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास प्रारंभ करण्यात आला होता. पुरस्कारासोबत
पंचवीस लाखांचे रोख बक्षीस देण्यात येते. तर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) हे हा पुरस्कार मिळवणारे प्रथम खेळाडू ठरले होते.

 

 

आणखी कोणाला मिळाला खेलरत्न पुरस्कार?

टेनिसपटू लिअँडर पेस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू पुलेला
गोपिचंद, नेमबाज अभिनव बिंद्रा, अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, बॉक्सिंगपटू मेरी कोम, क्रिकेट रोहीत
शर्मा, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि
महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

 

 

Web Title : khel ratna award will hereby be called the major dhyan chand khel ratna award narendra modi gives reason

 

हे देखील वाचा :

Pune News | विविध मागण्यांसाठी होमगार्डचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा, वर्षा बंगल्याबाहेर करणार ठिय्या आंदोलन

Chandrakant Patil And Raj Thackeray | ‘युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता’; भाजपाकडून स्पष्ट

Manisha Kayande | ‘अमृता फडणवीसांना सध्या कोणतेही काम नाही, BJP ने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी’

 

Related Posts