IMPIMP

ONGC | भारतीय बनावटीची अत्याधुनिक ड्रिलिंग रिग ओएनजीसीकडे सुपूर्द

by nagesh
ONGC | State of the art drilling rig of Indian origin handed over to ONGC

अहमदाबाद (गुजरात) : वृत्तसंस्था ONGC | मेक इन इंडिया (Make in India) व आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत (atmanirbhar bharat scheme) भूगर्भातील कच्चे तेल व गॅस काढणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक, स्वयंचलित व पोर्टेबल ड्रिलिंग रिगची (ड्रिलिंग मशिन) निर्मिती करण्यात आली आहे. हैदराबाद येथील मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड megha engineering and infrastructure limited – MEIL (एमईआयएल) या कंपनीने ही रिग तयार केली असून अहमदाबाद (Ahmedabad) जवळ मेहसाणा (Mehsana) येथील कलोल तेल क्षेत्रात नुकतीच ती ओएनजीसीकडे (ONGC) सुपूर्द करण्यात आली.

 

 

या अत्याधुनिक रिग मुळे भूगर्भातील कच्चे तेल आणि गॅस काढणे आता अधिक सोपे व कमी खर्चाचे होणार आहे. भारतीय बनावटीची ही सुरक्षित रिग अल्पावधीत 4 ते 6 किलोमीटर खोलीपर्यंत तेल विहिरीची खोदाई करून त्यातील तेल व गॅस काढू शकते. आत्तापर्यंत जुन्या व पारंपारिक पद्धतीच्या रिग द्वारे हे काम केले जात असे. त्यामुळे अधिक कालावधी बरोबरच उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत असे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रातील मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ने तयार केलेल्या या रिगच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप मर्यादित असल्याने व्यक्तिगत सुरक्षेला प्राधान्य मिळाले आहे. 2019 मध्ये मेघा इंजिनियरिंगला 6000 कोटी रुपयांच्या 47 रिगच्या निर्मितीचे कंत्राट मिळाले असून डिसेंबरपर्यंत त्यातील 20 रिग ओएनजीसीकडे सुपूर्द करण्यात येतील, असे कंपनीचे अध्यक्ष श्रीनिवास रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. विविध इंजिनियरिंग व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. रस्ते बांधणी, बोगदे निर्मिती, धरणे, लिफ्ट इरिगेशन, नदी जोड असे हजारो कोटींचे प्रकल्प कंपनीच्या हातात असून ते वेळेत पूर्ण करण्यावर कंपनीचा भर आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

 

मेघा इंजिनियरिंगच्या तेल उत्पादन रिग्ज विभागाचे प्रमुख एन. कृष्णकुमार (N. Krishnakumar) यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, तेल उत्पादनासाठी आत्तापर्यंत आपल्याला परदेशातून रिग आयात कराव्या लागत असत. तेल विहिरी खोदण्याच्या या क्षेत्रात अग्रेसर असलेली ड्रिलमेक ड्रिलिंग टेक्नॉलॉजिस ही इटालियन कंपनीच मेघा इंजिनियरिंगने विकत घेतली असून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे हैदराबाद येथे रिगचे उत्पादन सुरु केले आहे. भारतात तयार झालेल्या या रिगमुळे कच्चे तेल व गॅसचे उत्पादन स्वस्त, सोपे, वेगवान आणि सुरक्षित झाले आहे. ओएनजीसीसाठी बनविलेली 1500 एचपी क्षमतेची दुसरी रिग कलोल तेल क्षेत्रातील धमासना गावात कार्यरत होत असून अल्पावधीत ती चार किलोमीटरपर्यंत खोदाई करु शकेल. तसेच ती 40 वर्षेपर्यंत विना तक्रार कार्यरत राहू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने तयार केलेल्या या रिग पोर्टेबल असल्याने ओएनजीसीला देशभरात कोठेही त्यांचा वापर करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत या योजना यशस्वी करायच्या असतील तर आपल्याला इंधनाच्या आयातीत घट केली पाहिजे,
मेघा इंजिनियरिंगने या प्रकल्पाद्वारे आपला वाटा उचलला असून त्यामुळे परकीय चलन खर्चात मोठी कपात होईल,
असा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी (P. Rajesh Reddy) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आगामी 35 महिन्याच्या कालावधीत सर्व 47 ड्रिलिंग रिग्ज ओएनजीसीला पुरविण्यात येतील, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

नवीन तेल विहिरी खोदण्याबरोबरच बंद पडलेल्या तसेच नादुरुस्त झालेल्या तेल विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठीही या रिगचा उपयोग होणार आहे, असेही ते म्हणाले.

– मेघा इंजिनियरिंगची पहिली स्वयंचलित, सुरक्षित व पोर्टेबल ऑईल ड्रिलिंग रिग गुजरात मधील कलोल तेल क्षेत्रात कार्यरत.
दुसऱ्या रिगचे काम पुढील महिन्यात सुरू होणार.

– भूगर्भात 4 ते 6 किलोमीटर खोदाई करून तेल व गॅस काढण्याची क्षमता. 40 वर्षेपर्यंत काम करण्याची क्षमता.

– मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमा अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या ड्रिलिंग रिगची निर्मीती.

 

Web Title : ONGC | State of the art drilling rig of Indian origin handed over to ONGC

 

हे देखील वाचा :

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Superfood For Men | पुरुषांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात ‘हे’ 10 सुपरफूड, डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

 

Related Posts