IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले – ‘तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा’

by nagesh
Ajit Pawar | Ajit Pawar told the officials; Said - 'You don't give me any reason, just work at my speed'

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (18 सप्टेंबर) रोजी बारामतीत (Baramati) नियोजित कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) सचोटी पद्धतीने काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अनेकवेळा त्यांनी कामाबाबत प्रशासन अधिकाऱ्याला झापलं आहे. आजही त्यातलचं एक उदाहरण पाहावयास मिळालं. सकाळी कार्यक्रमादरम्यान पवार यांनी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. असं त्यांनी पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांना म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर, पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितले. त्यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे.

केंद्र सरकारने जिल्हा सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्याच्या विरोधात राज्य सरकार न्यायालयात जाणार असल्याचं देखील अजित पवार यांंनी सांगितलं आहे.
जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार केंद्र सरकारने जवळपास काढून घेतला आहे.
त्यामुळे न्यायालयात जाणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
दरम्यान, आम्ही चांगल्या पद्धतीने बँक चालवण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या 5 बँकांमध्ये सातारा आणि पुणे जिल्हा बँक आहे.
आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात यावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत.
त्याच्या विरोधात आम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढं कसं जायच याचा विचार करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar told the officials; Said – ‘You don’t give me any reason, just work at my speed’

हे देखील वाचा :

Karuna Sharma | …म्हणून करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

Pune Vasundhara Project | 107 एकरवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्प प्रशासनाकडून मान्य, स्थायी समितीला सादर

Pune Crime | अंघोळ करण्यासाठी गेलेले 2 तरुण नदीत बुडाले

GST Council | जीएसटी कौन्सिलचा निर्णय ! 1 जानेवारीपासून मंथली GST रिटर्न दाखल न केल्यास जमा करू शकणार नाही GSTR-1

Related Posts