IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध

by nagesh
Ajit Pawar | protest by burning effigy of ajit pawar in front of house in baramati

बारामती : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले. अधिवेशनादरम्यान विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पहायला मिळाला. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) हजरजबाबीपणामुळे बऱ्याचशा मुद्यांवरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडले. त्यातच अधिवेशनादरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. आज (सोमवारी) त्यांच्या बारामती येथील सहयोग निवासस्थानी भाजप व शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी त्यांनी अजित पवारांचा (Ajit Pawar) प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला.

 

नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक आहेत. असे वक्तव्य केले होते. त्यावर विविध स्तरांतून अजित पवारांवर टीका होत होती. त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या निषेधार्थ बारामती भाजप व शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानावर एक मोर्चा काढला होता. त्यादरम्यान त्यांनी अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. तसेच उपस्थित भाजप व शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हाय..हाय! धरणवीर अजित पवार अशा घोषणा दिल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हे आंदोलन भाजपच्या वतीने भिगवण चौकात आयोजित करण्यात आले होते. मात्र यावेळी पोलिसांना चकवत अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या (Ajit Pawar) सहयोग निवासस्थानाबाहेर जमा झाले आणि अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ बारामती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 

दरम्यान अजित पवारांच्या (Ajit Pawar) या वक्तव्यावर सत्ताधारी भाजप अतिशय आक्रमक झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळेंनी ट्वीट करत अजित पवारांवर निशाणा साधला होता.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले होते की, “धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये!.
तसेच भाजपचे तुषार भोसले आणि निलेश राणे यांनी देखील या प्रकाराबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार
यांच्यावर टीका केली आहे. तसेच या प्रकरणी अजित पवारांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | protest by burning effigy of ajit pawar in front of house in baramati

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | बंगल्यांच्या चौकशीबाबत बोलायचं असेल तर किरीटभाऊंनी आधी मुख्यमंत्र्यांकडे पहावं – सुषमा अंधारे

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे हाजिर हो!, ‘या’ तारखेला राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार, काय आहे प्रकरण?

Pune Crime | पाण्याच्या हौदात पडून २ वर्षाच्या मुलीचा मृत्यु; सिमेंट पाईप बनविणार्‍या कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल

 

Related Posts