IMPIMP

Maharashtra Politics | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात

by nagesh
Maharashtra Politics | big setback to ncp in baramati many office bearer left the party and join balasahebanchi shivsena shinde group

बारामती : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | राज्यातील राजकारणात अलिकडे अनेक नवी राजकीय समिकरणे जुळून आली आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुक होणार आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका होणार आहे. त्यावर आता सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय पक्षप्रवेशांची मालिका सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्य बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जोरदार धक्का बसला आहे. बारामतीतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष रणनिती आखताना दिसत आहेत. त्याचाच भाग म्हणुन बारामतीतील (Baramati) शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाकडे पाहिले जाते. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुका, करमाळा, सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)

 

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करून या पक्षप्रवेशाबाबतची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘पुणे जिल्ह्यातील बारामती, दौड, इंदापूर
तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत
प्रवेश केला.’ मंत्रालयातील बाळासाहेब भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pawaskar),
समन्वयक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी व सहकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | big setback to ncp in baramati many office bearer left the party and join balasahebanchi shivsena shinde group

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | तहसीलदारांच्या कारवाईनंतरही गोपीचंद पडळकर म्हणतात, ‘ती जागा आमचीच; अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई…’

Republic Day | देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’

Sanjay Biyani Murder Case | नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात NIA ला मोठे यश, प्रमुख शूटरला नेपाळ बॉर्डरवरुन अटक

 

Related Posts