IMPIMP

Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन अजित पवार म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | Maharashtra is strong! Deputy Chief Minister Ajit Pawar said - 'Thank you to all the brothers and sisters, mothers and young friends who have supported the Maha Vikas Aghadi Government during the last 2 years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमावेळी व्यासपीठावरील उपस्थित भाजपा नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भविष्यात एकत्र आलो तर..भावी सहकारी असा भाजपा नेत्यांचा उल्लेख केला. यावरुन राज्यात अनेक तर्कवितर्क होऊ लागले आहेत. दरम्यान, या विधानावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी पवार हे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय कसं चालवायचं, समस्या काय याच्याच चर्चा होतात. आज पूर्णपणे बहुमत महविकास आघाडीकडे आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया आली आहे. फडणवीस यांनी म्हटलं, त्यांच्या शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाहीत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत.

 

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

औरंगाबाद येथील कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. व्यासपीठावर मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) असा उल्लेख केला.
तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सूचक विधान केलं.
या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं. या दोन्ही वक्तव्यांने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | how will i decide what the cm should say ajit pawar reaction on uddhav thackeray statement

 

हे देखील वाचा :

Raosaheb Danve | युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी चालतील का?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

FIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल

Anil Deshmukh | ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नाव नाही?; सचिन वाझेसह 14 आरोपी

Mumbai Crime | वयोवृद्ध आईवडिलांची छळवणूक ! मुलाला 10 दिवसात अलिशान घर सोडण्याचे कोर्टाचे निर्देश

 

Related Posts