IMPIMP

Crime News | गणेशोत्सवात बड्या बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा टेबल ‘गरम’, 85 लाखाची रोकड जप्त तर 11 जण ताब्यात

by nagesh
Pune Crime | Crime Branch raids address club, 12 people detained

अंबरनाथ : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | अंबरनाथ येथे पोलिसांनी जुगार (Gambling) अड्ड्यावर छापा टाकून 85 लाख रुपये रोख तसेच 11 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई अंबरनाथ (Ambernath) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivajinagar Police Station) हद्दीत स्कॉड मार्फत करण्यात आली आहे. एका फार्महाऊसवर मोठा जुगार बसला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे (Addl CP Dattatreya Karale) यांना मिळाल्याने त्यांनी स्कॉड मार्फत जुगार अड्ड्यावर धाड (Crime News) टाकली आहे.

 

 

याबाबत माहिती अशी, अंबरनाथ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या शिवाजीनगरच्या फार्मिंग सोसायटीमधील फार्महाऊसवर मोठा जुगाराचा
अड्डा तयार केला होता. या अड्ड्यावर गणेशोत्सवाच्या काळात अतिरिक्‍त पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये रोख 85 लाख रुपयांसह 11 आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून याबाबत संबधित व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर शिवाजीवनगर पोलिस स्टेशनमध्ये (Ambernath Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळेस घडल्याने हे प्रकरण दाबण्यासाठीही पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर केल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.

 

 

दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईमध्ये अरुण विष्णू पाटील, आतिष पंढरीनाथ पाटील, ललित धुपचंद परमार, अजय संजय मोहोरीकर, प्रभात बिरजू जैस्वाल, आनंद रामचंद्र रेड्डी, भास्कर कृष्णा राऊत, जिग्नेश अरविंद परमार, सचिन मल्लप्पा मंचेकर, प्रज्योत जनक म्हात्रे, प्रवीण श्रीनिवासराव सदरला अशा 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

Web Titel :- Crime News | ganeshotsav table set builders farmhouse filled gambling den ambharnath

 

हे देखील वाचा :

T-20 World Cup 2021 | विराट कोहली कर्णधार पदावरुन ‘पायउतार’ होणार; रोहित शर्मा भारताचा कर्णधार?

Shiv Sena | महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य; मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर

Pune Crime | लॉकडाऊनने सहली झाल्या ‘रद्द’; हॉलिडे पॅकेजचे पैसे केले ‘फस्त’

 

Related Posts