IMPIMP

EPFO | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! ‘ईपीएफओ’कडून आता बेरोजगारांना संधी; तात्काळ करा नोंदणी, जाणून घ्या

by nagesh
EPFO | epfo members can apply for non refundable epf advance online

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आत्मनिर्भर भारत रोजगार योजना Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana (ABRY) अंतर्गत तरुणांना सहज नोकऱ्या मिळवण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. रोजगाराच्या शोधात असलेले युवक आता आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत स्वत:ची नोंदणी करू शकतात. या नोंदणीच्या माध्यमातून कंपनीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ सरकार भरणार आहे. त्याचबरोबर कंपनीच्या वतीने पीएफमध्ये जाणारी रक्कमही सरकार भरणार आहे. अशी माहिती EPFO ने दिली आहे.

दोन वर्षांसाठी 24 टक्के योगदान –
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) योजना अंतर्गत सरकार कर्मचारी आणि नियोक्त्याचा PF मधील हिस्सा दोन वर्षासाठी नियोजित करेल. यामुळे कंपन्यांना जादा नोकऱ्या देण्यासही प्रोत्साहन मिळणार आहे. योजनेचा लाभ सामील झाल्यापासून 24 महिन्यापर्यंत मिळू शकतो. यात पगाराच्या 24 टक्के वाटा सरकार देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वतीने 12 टक्के आणि नियोक्त्याच्या वतीने 12 टक्के भरले जातील.

योजनेची मुख्य अट –
ज्या कर्मचाऱ्यांचा पगार पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ दिला जाणार आहे,
असे सरकारने सांगितले आहे. कर्मचार्‍याचा पगार मासिक 15 हजारांची मर्यादा ओलांडताच,
सरकारकडून त्यांच्या PF खात्यामध्ये दिले जाणारे योगदान बंद केले जाईल. याशिवाय ज्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची
संख्या 1 हजार पेक्षा अधिक असणार आहे, त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

72 लाख कर्मचाऱ्यांचा फायदा होण्याचा अंदाज –
सुमारे 71.8 लाख नवीन कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
असे कर्मचारी जे 31 मार्च 2022 पर्यंत ईपीएफओमध्ये नोंदणी करतील, त्यांना पुढील २ वर्षांसाठी सरकारकडून PF योगदानाचा लाभ दिला जाईल. ही योजना अशा कंपन्यांसाठी लागू होईल, ज्यांनी ऑक्टोबर 2020 आधी EPFO मध्ये नोंदणी केलीय.

Web Title :- EPFO | registration under aatmanirbhar bharat rojgar yojana ABRY will get more benefit from epfo

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

7th Pay Commission | DA Arrear बाबत मिळाली ‘ही’ मोठी माहिती, जाणून घ्या कोणत्या दिवशी मोदी सरकार ट्रान्सफर करणार 2 लाख रुपये?

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं

How To Increase CIBIL Score | ‘सिबिल स्कोर’ वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा; कर्ज मिळवण्यासाठी कुठलीही येणार नाही अडचण, जाणून घ्या

Related Posts