IMPIMP

King Cobra | महिलेने हातात पकडला ‘किंग कोब्रा’, महिलेच्या धाडसाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

by nagesh
king cobra woman catches king cobra snake by hand video goes viral

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – King Cobra| सापाचं (Snake) नुसतं नाव जरी काढलं तरी आपली भांबेरी उडते. जर साप खरचं तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करणार ? तुम्ही नक्कीच घाबरुन जाल. एकीकडे लोक नुसतं सापाचं नाव जरी काढलं तर घाबरतात आणि दुसरीकडे काही लोक मात्र सापाला अजिबात घाबरत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. एक महिला भला मोठा किंग कोब्रा (King Cobra) साप पकडताना दिसत आहे. या महिलेने किंग कोब्रा (King Cobra) सापाला आपल्या हातात घेतल्याचे पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सोशल मीडियाच्या (social media) दुनियेत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला हातात भलामोठा किंग कोब्रा साप पकडत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला सापाला पकडण्यासाठी काठीचा वापर करते. परंतु नंतर ती हातातील काठी फेकून देते. त्यानंतर ती महिला आपल्या हातानंच या भयंकर विषारी सापाला (venomous snake) पकडण्याचा निर्णय घेते. ती सापाला आपल्या हाताने पकडते तेव्हा मागे उभा असणारे लोक तिला रस्ता देण्यासाठी बाहेरच्या दिशेने पळू लागतात.

 

https://www.youtube.com/watch?v=OKSCeY7boIw

 

 

महिला सापाला घेऊन घराबाहेर येते आणि रस्त्याच्या कडेला सापाला सोडून देते. परंतु साप पुन्हा घराकडे
जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ती पुन्हा सापाला पकडण्याचा प्रयत्न करते. मात्र, यामुळे साप तिच्यावर
हल्ला (snake Attack) करण्याचा प्रयत्न करोत. मात्र, या हल्ल्यापासून ती स्वत:चा बचाव करते. यानंतर ही
महिला सापाला पकडून एका बॅगेत टाकते. एका यूट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

 

इंटरनेटवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स (Likes) केले आहे.
तर 19 हजाराहून अधिक लोकांनी शेअर केला आहे. महिलेची साप पकडण्याची पद्धत पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
तर काही जणांनी महिलेची साप पकडण्याची पद्धत धोकायदायक असल्याचे म्हटलं आहे.

 

Web Title : king cobra woman catches king cobra snake by hand video goes viral

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पुणेकरांना आणखी दिलासा मिळणार ! सर्व व्यवहार रात्री 8 पर्यंत सुरु?

Pune News। पुण्यातील महिला पोलिस उपायुक्तांच्या ‘त्या’ गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

Pune Crime | तक्रार दिल्याच्या रागातून महापालिका अभियंता व ठेकेदाराकडून मारहाण

 

Related Posts