IMPIMP

Relationship | धोकेबाज प्रियकरानं SORRY बोलून मागितला दुसरा ‘चान्स’, आता 1 वेळा ‘चॅट’ करण्याच्या बदल्यात 20 हजार घेते प्रेयसी

by nagesh
Relationship | cheater lover asked for second chance now girlfriend takes 20 thousand for chatting once

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Relationship | प्रेम एक असे नाते (Relationship News) आहे जे विश्वासावर टिकते. यामध्ये फसवणूक करणे म्हणजे नात्याचा शेवट करण्यासारखे आहे. जर आपसात विश्वासच नसेल, तर नाते टिकू शकत नाही. तरीही अनेकजण प्रेमात फसवणुक करण्यास मागेपुढे पहात नाहीत. अनेक लोक सल्ला देतात की, जर प्रेमात एकदा धोका मिळाला तर, पुन्हा दुसरी संधी देऊ नये. परंतु सोशल मीडियावर एका मुलीने आपल्या प्रियकराने फसवणुक करूनही त्यास दुसरी संधी दिल्याबाबत माहिती दिली आहे, परंतु एका ट्विट सोबत.

मिसोरी (Missouri) च्या केन्सास शहरात (Kansas City) राहणारी हाले पियर्स (Haley Pierce) ने लोकांसोबत शेयर केले की, कशाप्रकारे आता ती आपल्या धोकेबाज प्रियकराला दुसरी संधी देऊन पैसे कमावत आहे?

 

 

यामुळे तिने केले ब्रेकअप

20 वर्षाच्या हालने सांगितले की, दोन वर्षाच्या चांगल्या रिलेशननंतर तिला समजले की, तिचा प्रियकर तिला धोका देत होता. तो इतर मुलींसोबत डेटिंग अ‍ॅपवर बोलत होता. हालेला आपल्या बर्थ-डेच्या दिवशी प्रिकराच्या फसवणुकीबाबत समजले. यानंतर तिने ब्रेकअप केले.

 

 

 माफी मागण्यासाठी आला प्रियकर

ब्रेकअपच्या काही काळानंतर हालेचा प्रियकर परतला. त्याने हालेची माफी मागितली. त्याने स्वताला मूर्ख म्हटले आणि दुसरी संधी मागितली. हाले ने ऑनलाइन आपल्या प्रियकराचे अनेक मेसेज वाचले होते.

 

 

एका अटीवर केले त्याच्याशी पॅचअप

तो अनेक महिलांसोबत फ्लर्ट करत होता. जेव्हा त्याने हालकडे माफी मागत दुसरी संधी मागितली तेव्हा तिने एका अटीवर त्याच्याशी पॅचअप केले. आपल्या या पद्धतीचा एक व्हिडिओ हालने ऑनलाइन शेयर केला, जो आतापर्यंत 44 लाख लोकांनी पाहिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

एका चर्चेसाठी चार्ज करते पैसे

हाले आपल्या प्रियकराला दुसरी संधी देण्याच्या बदल्यात भरपूर पैसे कमावत आहे. ती आपल्या प्रियकराला भेटण्यापासून चर्चा करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी चार्ज लावते. एकवेळ चॅट करण्यासाठी हाले 20 हजार रुपये घेते. याशिवाय भेटण्यासाठी वेगळा रेट ठरवला आहे.

 

 

लोकांच्या बोलण्याने मला फरक पडत नाही

हालेने सांगितले की, या पैशातून ती आपल्या कॉलेजचा खर्च करत आहे. सोबतच आपल्या कुटुंबाला सुद्धा
मदत करत आहे. हे माहिती शेयर केल्यानंतर लोकांनी यावर विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.

काहींनी तिच्या फेव्हरमध्ये काही लिहिले आहे तर काहींनी तिला लालची म्हटले आहे. मात्र, हालेने म्हटले की,
तिला कुणाच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही. ती आपल्या एक्ससोबत अशीच वागणार आहे.

 

Web Title : Relationship | cheater lover asked for second chance now girlfriend takes 20 thousand for chatting once

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी, सोनं ’47’ हजार पार; जाणून घ्या

Pune Crime | महिलेला काम देण्याच्या आमिषाने नेऊन लुबाडले ! डोक्यात दगड घालून केले जखमी, कोंढव्यातील धक्कादायक घटना

Coronavirus | राज्यात ‘या’ दिवसापासून कोरोनाची तिसरी लाट?; गणेशोत्सवापूर्वी ‘निर्बंध’ पुन्हा कडक

 

Related Posts